बुलढाणा : जिल्ह्यातील मेहकर (Buldhana Melhkar) तालुक्यातील डोनगाव (dongaon) येथील वरद ज्वेलर्समध्ये एक बुरखाधारी महिला आली होती, तिने सोन्याचे दागिने मागवले. मात्र ही महिला ज्याप्रमाणे दागिने दाखवायला सांगत होती. त्याप्रमाणे दागिने मुस्लिम समाजात घालत नाहीत. तेव्हा तिची हालचाल संशयास्पद वाटत असल्याने दुकानदाराने आपल्याकडे तसे दागिने नसल्याचे सांगत तिला परत पाठवले. यानंतर त्यांनी संशयित महिलेबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी (buldhana police) या महिलेवर पाळत ठेवली. ती महिला सराफा लाइनमधील विविध दुकानात गेली, त्यावेळी तिची लक्षणे पाहून पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता. तिने यापूर्वी देखील दागिने चोरल्याचे समोर आले आहे. मुमताज परवीन अब्दुल शकील असे या महिलेने आपले नाव सांगितले असून ती अकोला येथील आहे. डोणगाव पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे.
देशात आतापर्यंत अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामध्ये महिलांनी बुरखा घालून ज्वेलर्सच्या मालकांची फसवणूक केली आहे. त्याचबरोबर तिथून घटनास्थळावरुन पळ काढला. आतापर्यंत चोरीची अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत. त्याचबरोबर सीसीटिव्हीत सुध्दा कैद झाली आहेत. काहीवेळेला चोरटे टोळीने दुकानात शिरतात आणि गोंधळ घालून सोने लंपास करतात.
बुलढाणा जिल्ह्यात ताब्यात घेतलेल्या महिलेने आतापर्यंत किती ठिकाणी चोरी केली आहे याची पोलिस चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर त्या महिलेसोबत आणखी कितीजण आहेत, याची सुद्धा चौकशी होणार आहे. ती महिला अकोला येथील असल्याचे सांगितले आहे. राज्यात सुद्धा चोरीची अधिक प्रकरणं वाढली आहेत. त्यामुळे पोलिसांनी अधिक त्रास होत आहे.