मुंबई : आपली मुलं चांगली शिकावीत ती आपल्या पायांवर उभी रहावीत असे प्रत्येक पालकांना वाटत असतं. त्यामुळे पालक अधिक वेळ ही नोकरी, कामधंद्याकडे देतात. तर एकावेळी अर्थ आई-वडिल ही कामावर जाऊन पैसांमुळे मुलाचं भविष्य बिघडू नये म्हणून प्रयत्न करत असतात. मात्र त्यात कधी कधी जरा अतिउतावळे पणाही आड येतो. ज्यामुळे मुलांवर दबाव टाकला जातो. दुसऱ्या मुलांची उदाहरणे दिली जातात किंवा त्यांना ट्यूशनमध्ये (Tuition)जुंपलेही जाते. यामुळे मुलांची मानसिकता बिघडते. वाढत्या वयात मुलांना आई-वडिलांचा (Parents)वेळ मिळत नाही आणि जेव्हा ते समोर येतात तेंव्हा त्याच्यांवर दबाव टाकला जातो. अशातूनच मग मुलं ही आत्महत्येच्या मार्गावर जात आपले आयुष्य संपवतात. असाच प्रकार हा वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. जिथे एका 15 वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न (Attempted Suicide) केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलाचे जीव वाचले आहेत. ज्यामुळे पोलिसांचे कौतुक होत आहे. तर परिसरात त्याने असे टोकाचे पाऊल का उचले असा प्रश्न होताना दिसत आहे. तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत वनराई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाडा रहेजा संकुलन आहे. जिथे एक दाम्पत्य राहते. ते एका बँकेत कामाला आहेत. त्यांना एक 15 वर्षांचा मुलगा असून तो ट्यूशन्सला जातो. मात्र ट्यूशनला जाण्यापूर्वी त्याने घरी आत्महत्या करणार असल्याचे पत्र टाकले होते. ज्यात त्याने सांगितले की, तो आता पुन्हा जात आहे. कधी येणार नाही मला शोधण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे पालक ही घायकुतीला आले होते. तर पोलिसांच्यापुढे याला कसे आणि कुठे शोधावे असा प्रश्न पडला होता.
दरम्यान वनराई पोलीसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आपली तपासाची चक्रे हलवली. तसेच त्या विद्यार्थ्याचे मोबाईल लोकेशन शोधण्यासाठी त्याचा फोन ट्रेस केला. त्यावेळी रात्र आठ वाजता त्याचे लोकेशन हे आरे कॉलनीत छोटा काश्मीर तळ्याच्या जवळ दाखवत होते. वेळ न घालवता पोलिसांनी त्या परिसरात शोध घेतले असता तो तिथ दिसला. मात्र त्याने तळ्यात उडी मारली होती. त्यावेळी पोलिसांनी उडी घेत त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. तो पर्यंत परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आणि त्याला वनराई पोलीस ठाण्यात आणले. तोपर्यंत यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यांनीही पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.
दरम्यान पोलिस ठाण्यात त्याला आणल्यानंतर विचारणा केली असता त्या विद्यार्थ्याने आपली हकीकत सांगितली ज्यामुळे पोलिसही विचारात पडले होते. यावेळी विद्यार्थ्याने सांगितले की, त्याचे पालक बँकेत काम करतात. ते व्यस्त असतात. माझ्या शिकवण्या लावल्या आहेत. तर चांगले मार्क्स मिळावेत यासाठी दबाव टाकत असतात. तसेच पालक माझी काळजी घेत नाहीत. मग मी काय करू असे म्हणत त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.