एका महिला पोलीस शिपायाने लिव्ह इन रिलेशन अडसर ठरणाऱ्या आपल्याच वरिष्ठालाच कार खाली चिरडून ठार केल्याची घटना घडली आहे. प्रेमाच्या या त्रिकोणात अडचण ठरणाऱ्या पोलीस उप निरीक्षकाला फोन करुन तिने बोलावले आणि त्याच्या दुचाकीला कारने जोरदार धडक देत 30 मीटरपर्यंत फरफटत नेले. यात त्या सब इन्सपेक्टरचा जागीच मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सब इन्सपेक्टरच्या हत्येचे सनसनाटी प्रकरण उघडकीस आले आहे. मध्य प्रदेशातील राजगड येथील सब इन्सपेक्टर दीपांकर गौतम यांच्या हत्ये मागे कोणी दुसरे तिसरे नव्हे तर महिला शिपायी पल्लवी सोलंकी यांचे नवा पुढे आले आहे. पल्लवी सोलंकी आणि तिचा बॉयफ्रेंड करण ठाकूर या दोघांनी मिळून या सब इन्सपेक्टर दीपांकर गौतम यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. लव ट्रॅंगलमध्ये दीपांकर गौतम अडसर ठरत असल्याने त्यांच्या महिला पोलिस शिपायाने काटा काढल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिला शिपाई पल्लवी आणि तिचा साथीदार बॉयफ्रेंड किरण यांनी कोणत्या तरी बहाण्याने सब इन्सपेक्टर दीपांकर गौतम यांना नॅशनल हायवे वर बोलावले. त्यानंतर ते निघण्यासाठी बाईकवर बसले तेव्हा पाठून कारने त्यांना जोरदार धडक दिली. दीपांकरला त्यांनी तसेच फरफटत तीस मीटरपर्यंत घसपटत नेले. त्यात दीपांकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे दोघेही देहात पोलिस ठाण्यात आले आणि तक्रार नोंदवित असताना त्यांना अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
पल्लवी सोलंकी आणि करण यांची लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये एकत्र होते, परंतू दोघांमध्ये नंतर काही कारणाने भांडण झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळले. देहात पोलिस ठाण्यात नियुक्ती झाल्यानंतर पल्लवी हीचे सब इन्सपेक्टर दीपांकर गौतम याच्याशी सूत जुळले. त्यानंतर पुन्हा तिचा आधीचा बॉयपफ्रेंड किरण तिच्या आयुष्यात पुन्हा आला. त्यानंतर पल्लवी पुन्हा त्याच्याशी बोलू लागली. याचा दीपांकर गौतम याला राग आला. त्यानंतर त्याने किरणला भेटू नकोस अशा दम भरला.