अटल सेतूवर आला आणि… बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने का उचललं टोकाचं पाऊल?

| Updated on: Oct 01, 2024 | 12:42 PM

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या अटल सेतूवरुन पुन्हा एकाने उडी मारून स्वत:चा जीव घेतला आहे. यापूर्वी देखील या सागरीसेतू वरुन उडी मारून दोघांनी आपले प्राण गमावले आहेत.

अटल सेतूवर आला आणि... बँकेच्या डेप्युटी मॅनेजरने का उचललं टोकाचं पाऊल?
Follow us on

देशातील सर्वात मोठा सागरी सेतू असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बरलिंकवरुन ( अटल सागरी सेतू ) पुन्हा एकदा एकाने उडी मारली आहे. यापूर्वी देखील या सागरी सेतूवरुन अनेकांनी उडी मारुन जीव दिला आहे. एका 56 वर्षांच्या महिलेला ड्रायव्हरच्या सर्तकतेमुळे पोलिसांच्या तत्परतेने वाचविण्यास यश देखील आले आहे. ताज्या घटनेतील व्यक्तीने आपली एसयुव्ही कार पुलावर उभी केली आणि त्याने समुद्रात उडी घेतली. येथील वाहन चालकांनी पोलिसांना माहिती दिली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. या पुलावरुन एका महिला डॉक्टर आणि एका इंजिनिअरने या पूर्वी उडी मारुन स्वत:ला संपविले आहे.

मुंबईतील अटल सागरी सेतूवर एकाने आपली एसयुव्ही थांबविली आणि समुद्रात उडी मारली. या व्यक्तीने ट्रान्सहार्बर लिंकवर गाडी थांबविली आणि त्याने खाली उडी मारल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. ही घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतू त्याचा काही थांगपत्ता लागलेला नाही. एका अधिकाऱ्याने सांगितले की हा व्यक्ती एसयुव्ही घेऊन पुलावर गेला आणि कारला एका साईनबोर्ड जवळ पार्क केले आणि त्याने थेट समुद्रात उडी मारली. हे वाहन सुशांत चक्रवर्ती यांच्या नावाने रजिस्टर आहे. येथील वाहनचालकांनी पोलिसांना या संदर्भात कल्पना दिल्यानंतर शिवडी पोलिस आणि सागरी पोलिसांनी घटनास्थळी शोध मोहीम सुरु केली. पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेतला असता ते  एका राष्ट्रीय बॅंकेत विमा विभागात डेप्युटी मॅनेजर असल्याचे समजते. त्याने पत्नीला आपण कार्यालयात पोहचल्याचा संदेशही मोबाईलवरुन पाठविला होता. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले. त्याला सात वर्षांची मुलगी देखील असून हे कुटुंब परळ व्हीलेजमध्ये रहात असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे.

डॉक्टर-इंजिनियर यांनी देखील गमावले प्राण

अटल सेतुवर याआधी अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यात आर्थिक समस्येला कंटाळून एका 38 वर्षी अभियंता श्रीनिवास यांनी अटल सेतूवरुन उडी मारून जीव दिला होता. त्याचाही मृतदेह त्यावेळी सापडला नव्हता. तर मार्च महिन्यात ठाणे जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरने अटल सेतूवरुन उडी मारल्याने तिचा मृत्यू झाला होता. तिचाही मृतदेह सापडला नव्हता. तर एका 56 वर्षांच्या महिलेने देखील अटल सेतूवरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतू ड्रायव्हर आणि पोलीसांच्या तत्परतेमुळे तिला वाचविण्यात यश आले होते.

देशातील सर्वात मोठी सागरी सेतू

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक देशातील सर्वात लांब सागरी सेतू असून तो दक्षिण मुंबईच्या शिवडी ते नवी मुंबईतील न्हावाशेवा बंदराला जोडतो. या पुलाचे उद्घाटन जानेवारी महिन्यात झाले होते. सहा पदरी पुल 21.8 किमी लांबीचा असून त्याचा 16.5 किमीचा भाग समुद्रावर आहे. हा पुल इंजिनिअरिंग मार्व्हल म्हणून ओळखला जातो. हा पुल सध्या श्रीमंताचे जीवन संपविण्याचे ठीकाण म्हणून कुप्रसिद्ध झाला आहे.