बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर शहरातील ( Malkapur City) घिर्णी गावाजवळ कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर (Kalyan Toll Infrastructure) कंपनीच्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. या धडकेत बेलाड येथील प्रदीप भरत निंबाळकर या युवकाचा मृत्यू झाला. मोटरसायकलवरील इतर दोन जण गंभीर इतर जखमी झाले. प्रदीपचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह हा थेट कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कार्यालयात नेला. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची आक्रमक भूमिका घेतली.
घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश ऐकडे, अप्पर पोलीस अधीक्षक थोरात, यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह उचलून अंतिम संस्कारसाठी आणला. मात्र जवळपास दोन तास मृतदेह याच कंपनीमध्ये ठेवण्यात आला होता.
कल्याण टोल इंफ्रास्ट्रक्टर कंपनी आहे. या कंपनीचा हा टिप्पर होता. टिप्परचालकानं दुचाकीला धडक दिला. यात प्रदीप निंबाळकर या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या दुचाकीवरील इतर दोघे जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.
टिप्परचालकाच्या निष्काळपणामुळं हा अपघात झाल्याचं मृतकाच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं. प्रदीपच्या मृतदेहाचं आधी शवविच्छेदन करण्यात आलं. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट कंपनीच्या कार्यालयात नेलं. त्यामुळं प्रकरण चांगलचं चिघळलं होतं.
लोकप्रतिनिधी, पोलीस हेही घटनास्थळी गेले. नातेवाईकांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी प्रदीपचा मृतदेह उचलून नेला. पण, दोन तास कंपनीच्या कार्यालायात मृतदेह ठेवला होता.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिनव त्यागी, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी व मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश इकडे पोहोचले. मृतकाच्या परिवाराला 5 लाख रुपयांची मदत दिल्यानंतर प्रकरण मिटले.