बिहार : रात्रीच्या अंधारात प्रेयसीला भेटायला जायचा, याची खबर ज्यावेळी तिथल्या ग्रामस्थांना मिळाली. त्यावेळी त्यांनी पाळत ठेवली आणि तरुणाला (bihar viral news) ताब्यात घेतलं. त्या तरुणाचे हात आणि पाय बांधून मारहाण केली आहे. त्याचबरोबर त्या तरुणाचा व्हिडीओ (trending marathi news) सुध्दा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. ज्यावेळी हा व्हिडीओ पोलिसांपर्यंत गेला, त्यावेळी पोलिस गावात पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणात गावकऱ्यांची चौकशी केली आहे. हा प्रकार बिहार (bihar crime news in marathi) राज्यातील गोपालगंज जिल्ह्यातील आहे.
बिहार राज्यातील फुलवरिया या गावातील हे प्रकरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका तरुणाचं फुलवरिया गावातील एका तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. तरुण आपल्या प्रेयसीला रात्री नेहमी भेटायला येत होता. परंतु लोकांना या गोष्टीची माहिती नव्हती. परंतु गावातल्या काही लोकांना तो तरुण येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पाळत ठेवायला सुरुवात केली.
तो तरुण तरुणीच्या घरात दाखल झाल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली, त्यानंतर लोकांनी त्या तरुणाला ताब्यात घेतलं. काहीवेळात तिथं लोकं जमा झाली. ग्रामस्थांनी त्या तरुणाला तिथं लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला एका रश्शीने बांधण्यात आले. त्यानंतर सकाळी त्या तरुणाला काही लोकांनी समज देऊन सोडून दिलं आहे.
या प्रकरणाचा व्हिडीओ ज्यावेळी पोलिसांपर्यंत पोहोचला, त्यावेळी पोलिस तिथं चौकशीसाठी दाखल झाले आहेत. या प्रकरणात अद्याप कोणीचं तक्रार दाखल केलेली नाही. पण त्या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.
गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की, तो तरुण अनेक दिवसांपासून तिथं येत होता. काहीवेळा तिथल्या गावकऱ्यांनी त्या तरुणाला समजून सांगितलं आहे. परंतु तो तरुण कोणाचही ऐकायला तयार नव्हता. ज्यावेळी तो तरुण तरुणीच्या घरात घुसला, त्यावेळी सगळ्या लोकांनी मिळून त्याला मारहाण केली. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत.