कानपूर, ९ सप्टेंबर २०२३ : दहा वर्षांपूर्वीची ही घटना. एका डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. त्याची ओळख अमरोधा पीएचसी प्रभारी डॉक्टर सतीश चंद्रा अशी झाली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तेव्हा डॉक्टरचा प्रायव्हेट पार्ट नव्हता. मृतदेह सापडला तिथंल्या भिंतीवर लिहिले होते, जेव्हा माणूस प्रकृतीशी छेडछाड करतो तेव्हा प्रकृती त्याला आपल्या पद्धतीने व्यवस्थित करते. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर त्यामागील सत्य समोर आले. पोलिसांनी महिलेला अटक केली. महिलेला असे धक्कादायक कृत्य करण्यामागचे कारण विचारण्यात आले. महिलेने कहाणी सांगितली.
पीडित महिला म्हणाली, डॉक्टर सतीश चंद्रा याने मला गोड गोड बोलून फसवले. तो माझ्यावर नेहमी अत्याचार करत होता. अनैसर्गिक पद्धतीने वागत होता. मी खूप परेशान झाली होती. डॉक्टरपासून सुटका करण्याच्या प्रयत्नात होती. डॉक्टरने नंतर आपली नजर तिच्या बहिणीकडे वळवली होती. त्यामुळे डॉक्टरचा गेम करण्याचा विचार केला.
१५ जुलै २०१३ ची घटना. डॉक्टरने महिलेला फोन करून बोलावले. त्यावेळी ती तयार नव्हती. पुन्हा २१ जुलै रोजी डॉक्टरने महिलेला बोलावले. महिला पूर्ण तयारीनिशी त्याला भेटायला गेली. महिलेने नशेच्या गोळ्या त्याला दारूतून दिल्या. तो बेहोश झाला. चाकूने त्याच्या शरीरावर वार केले. त्यात डॉक्टरचा मृत्यू झाला. महिलेने डॉक्टरचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापला. त्यानंतर रक्ताने भिंतीवर संदेश लिहिला. मागच्या गल्लीतून निघून गेली. कानपूरला पोहचल्यानंतर डॉक्टरच्या पत्नीला त्याचा प्रायव्हेट पार्ट कुरिअरने पाठवला. पोलिसांनी महिलेविरोधात आरोपपत्र दाखल केले. महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दहा वर्षानंतर तिला जामीन मंजूर करण्यात आला.
कानपूरमध्ये एका खून प्रकरणात महिलेला जामीन मिळाला. या महिलेने अत्याचार करणाऱ्या डॉक्टरचा खून केला. त्यानंतर डॉक्टराचा प्रायव्हेट पार्ट कापला. तो कापलेला प्रायव्हेट पार्ट पॉलिथीनमध्ये भरून डॉक्टरच्या पत्नीला कुरिअर केला. या प्रकरणात महिलेला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दहा वर्षे जेलमध्ये राहिल्यानंतर महिलेला जामीन मिळाला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर महिला आरोपीला जामीन मिळाला.