धुळे : मध्यरात्रीनंतर पेट्रोल पंपावरील (Petrol pump) बंद कॅबिनच्या खिडकीची जाळी तोडून सुमारे ५१ हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याची घटना नुकतीचं उघडकीस आली असून याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात (shirpur city police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तिथली सीसीटिव्ही तपासून पाहत आहेत. केबिनची खिडकी उचकटून चोरी केली आहे. तीन कर्मचारी झोपल्यानंतर हा प्रकार घडला आहे. सीसीटिव्ही (CCTV) पोलिस तपासत असल्यामुळे चोरटे सापडतील असं पोलिसांनी सांगितलं आहे. कॅशिअरची सुद्धा पोलिस चौकशी करीत आहे.
शिरपूर शहराजवळील शिरपूर फाटा येथे असलेल्या सी.आर.पेट्रोल पंपावर चोरीची घटना घडली. सी.आर पेट्रोल पंपाचे कॅशिअर कृष्णा संजय मोरे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले की, दि २३ रोजी रात्री १० वाजेपासून दि २४ रोजी सकाळी ८ वाजेपापर्यंत कॅशिअर कृष्णा संजय मोरे यांची पेट्रोल पंपावर ड्युटी होती. रात्रीचे सर्व कामकाज आटोपून कृष्णा पाटील दि २४ रोजी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास कॅबीनचे लॉक लावून झोपून गेले. सकाळी 6 वाजेच्या सुमारास कृष्णा पाटील यांनी झोपेतून उठून कामकाजाला सुरुवात केली. त्यावेळी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली पेट्रोल पंपाची ५१ हजारांची रोकड चोरी झाल्याचे समजले. यावेळी कॅबिनच्या मागे असलेल्या खिडकीची जाळी तुटल्याचे कृष्णा पाटील यांना दिसून आले. या घटनेबाबत शिरपूर पोलीसांना माहिती दिली, घटनास्थळी पोलीसांनी चौकशी करत सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन संशयिताचे शोधकार्य सुरु केले आहे.
महाराष्ट्रात या आगोदर सुध्दा अशा पद्धतीचे अनेक गुन्हे घडले आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी सीसीटिव्हीच्या मदतीने गुन्हेगारांना ताब्या घेतलं आहे.