नाशिक : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील सराफा बाजारात (Bullion Market) भर दुपारी चोरी झाल्याची घटना घडली आहे. भागीरथी ज्वेलर्समध्ये लहान मुलीसोबत आलेल्या तीन महिलांनी (Women) सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स लांबविला आहे. या बॉक्समध्ये तब्बल साडेचार लाखांचे दागिने होते. या महिलांनी दागिन्यांचा बॉक्स घेऊन पळ काढला. ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरीची घटना लक्षात आल्यानंतर ज्वलर्सच्या मालकाकडून अज्ञात आरोपीविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज्या आधारे आरोपी महिलांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. लहान मुलीच्या मदतीने या महिला चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील सराफा बाजारात भागीरथी नावाचे एक ज्वेलर्स आहे. संबंधित महिला चोरीच्या उद्देशाने या ज्वेलर्समध्ये शिरल्या, तीन महिलांसोबत एक लहान मुलाग देखील होता. या महिलांनी सोने खरीदीच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. दुकानात प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलांनी दुकानदाराची नजर चूकवून दागिन्याचा एक बॉक्स लंपास केला.
दरम्यान चोरीची घटना लक्षात आल्यानंतर ज्वलर्सच्या मालकाने आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या महिलांचा शोध घेत आहेत. या महिला चोरीसाठी लहान मुलांचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राम तेरी गंगा मैली, आधी प्रेम नंतर लोच्या- मग एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा का काढला काटा?
विक्की नगराळेला फाशीची शिक्षा का नाही? उज्वल निकमांनी कारण सांगितलं, पुन्हा कोर्टात खटला जाणार?