नागपूर : नागपूरमधून (Nagpur) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आधी चोराने नागपुरातील हनुमानाच्या एका मंदिरातील चांदीची गदा चोरली. चोरीची (Theft)ही घटना मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली. मात्र चोरीच्या घटनेनंतर चोराला पश्चाताप झाला, आणि त्याने ती चांदीची गदा परत तिथे आणून ठेवली. आधी चोरीची आणि नंतर चोराने ती गदा परत मंदिरात आणून ठेवल्याची अशा दोन्ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या मदतीने चोराचा शोध घेऊन त्याला अटक केली. संदीप लक्षणे असं या आरोपीचं नाव आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण पाहू शकता. चोराने आधी मंदिरातून चांदीची गदा चोरली. त्यानंतर त्याने तिथून पळ काढला. मात्र त्यानंतर त्याने पुन्हा ती गदा मंदिरात आणून ठेवली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोराला पश्चाताप झाल्यामुळे त्याने ती चांदीची गदा पुन्हा तिथे आणून ठेवली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही चोरीची घटना मंदिरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत अखेर या चोराला बेड्या ठोकल्या. संदीप लक्षणे असं या आरोपीचं नाव असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.