पुणे : मागे दोन वर्षांपुर्वी कोरोना आला आणि सारा देश थांबला. यावेळी घडणारे गुन्हेही थांबले होते. मात्र कोरोनाचा प्रकोप कमी झाला आणि पोलिसांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. तर लोकांची झोप उडाली आहे. दरम्यान शहरात घरफोडी, जबरी चोरी (Theft)आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यांत पुन्हा वाढ झाल्याचे दिसून आले आहे. गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असले तरी, ते उघडकीला आणण्याचे प्रमाण मात्र घटत असल्याचे चित्र देखील काही प्रमाणात आहे. त्यातच आता शहरात घरामध्ये होणारी चोरी हॉटेलमध्ये (hotel) होताना दिसत आहे. त्यातच ती चोरी मॅनेजरनेच केल्याचे उघड झाल्याने हॉटेल मालकाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला आहे. तर शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar police) तक्रारीवरून त्या मॅनेजरला सापळा लावून पकडे आहे. त्याचे नाव अजय सस्क्सेना (रा. उत्तर प्रदेश) असे आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील शिवाजीनगर भागात रिजंट हॉटेल आहे. तेथे अजय सस्क्सेना (रा. उत्तर प्रदेश) हा आला होता. तसेच त्यांने आपल्याला काम नाही काही काम असेल तर द्या अशी मालकांकडे मागणी केली होती. त्याच्या हालाखीकडे पाहत मालकांनी त्याला आपल्या हॉटेलची जबाबदारी मॅनेजर म्हणून दिली. मात्र अजय सस्क्सेना याने 17 तारखेला त्याने आपला हात गल्ल्यावर साफ केला. अजय सस्क्सेना याने दिवसभर जमा झालेली 22 हजार 500 रुपयांची रक्कम गल्ल्यातून घेऊन पसार झाला होता.
दरम्यान याची माहिती हॉटेल मालकाला मिळाली आणि त्यांनी याची तक्रार शिवाजीनगर पोलिसांना तात्काळ दिली. ज्यानंतर पोलिसांनी माहितीच्या आधारे आणि सीसीटीव्ही पाहून त्याची माहिती गोळा केली. तसेच त्याचा फोनही लोकेशन ट्रेस केला होता. त्यावेळी आधी मुंबई आणि त्यानंतर पुन्हा पुणे लोकोशन मिळाल्यावर पोलिसांनी आपली तपास चक्रे अधिक गतिमान केली. तसेच अजय सस्क्सेना याचं लोकोशन बुधवारपेठ येथे दाखवत असल्याने तेथेच त्याचा शोध वाढवला. तब्बल दहा तास शोध घेतल्यानंतर अजय सस्क्सेनाची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर सापळा लावून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याने चोरलेली संपुर्ण रक्कम ही पोलिसांनी हस्तगत केली आहे.