नवी दिल्ली : सध्या एक धक्कादायक गोष्ट (crime news in marathi) घडली आहे. एका मुलाने आपल्या आई वडिलांची झोपेत हत्या (murder case) केली आहे. सकाळी ही गोष्ट माहित झाल्यानंतर पोलिस आणि ग्रामस्थांना धक्का बसला आहे. आई आणि बापाची हत्या केल्यानंतर मुलाने तिथून पळ काढला असल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना (police) दिली आहे. संपूर्ण घरात रक्ताचे शिंतोडे उडाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. ज्यावेळी या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यावेळी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं आहे.
एकाचं कुटुंबातील दोन व्यक्तींची हत्या झाल्याची माहिती ज्यावेळी पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिस घटनास्थळी पोहोचले. विशेष म्हणजे त्या जिल्ह्यातील एसपी सुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते. ज्या व्यक्तींचा खून झाला आहे. त्यांची नावं रामलाल आणि राम जानकी अशी आहेत. तिथल्या लोकांनी पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, रामलाल यांच्या दोन्ही मुलांमध्ये संपत्तीवरुन मागच्या कित्येक दिवसांपासून वाद सुरु होता. त्यांच्या मोठ्या मुलाला असं वाटतं होतं की छोट्या भावाला अधिक संपत्ती वडील देत आहेत.
या कारणामुळे रमाकांतचा काहीवेळा आपल्या आई वडिलांसोबत मोठा वाद झाला आहे. गुरुवारी रात्री आई वडील ज्यावेळी झोपले होते. त्यावेळी रमाकांत याने आपल्या आई वडिलांच्यावरती कुऱ्हाडीने वार केले.
ज्यावेळी रामलाल आणि त्यांच्या मुलाची भांडणं झाली होती. त्यावेळी वडिलांनी मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी साधी चौकशी सुध्दा केली नाही अशा माहिती रमालाल यांच्या छोट्या मुलाने सांगितली आहे.
पोलिस काहीचं करीत नसल्यामुळे आरोपीचं मनोबल वाढत गेलं. रमालाल यांच्या मोठ्या मुलाने झोपेत धारधार कुऱ्हाडीने वार केले. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं की, ज्यावेळी आरोपीने आई बापाचा ज्यावेळी खून केला. त्यावेळी कुऱ्हाड नाचवत तिथून त्याने पळ काढला. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील औरैया जिल्ह्यातील आहे.
आई वडिलांनी चार एकर जमीन दोन भावात वाटून दिली. रमाकांत या मुलाला काहीचं दिलं नाही. त्यामुळे रमाकांत नाराज होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस या प्रकरणात कुटुंबातील सगळ्यांची चौकशी करणार आहे.