कोल्हापूर : अन्याय झालेल्या लोकांना न्याय देण्याचं काम न्यायाधिश करतात. भारतीय लोकशाहीत न्यायववस्था ही सर्वोच्च मानली जाते. न्यायदानाचे काम करणारं न्यायाधीश हे पददेखील तेवढीच प्रतिष्ठा आणि सन्मानाचं आहे. मात्र, कोल्हापुरात (Kolhapur) न्यायधीशांसोबत एक विचित्र प्रकार घडला आहे. एक माथेफिरू चोर (Thief) मागील काही दिवसांपासून न्यायाधीशांचे कपडे वारंवार चोरुन नेत असल्याचे समोर आले आहे. या विचित्र चोरीनंतर न्यायधीश (Judge) प्रचंड वैतागले होते. अखेर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सापळा रचत चोरट्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी कोर्टासमोर हजर केल्यानंतर या चोराला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील भुदगड तालुक्यात गारगोटी येथे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय आहे. याच परिसरात नायाधीशांचे विवासस्थानदेखील आहे. या निवासस्थानात ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहतात. येथे सहकुटुंब राहत असल्यामुळे ते कपडे धुवून निवासस्थानाच्या आवारात वाळायला घालत. मात्र मागील काही दिवसांपासून न्यायाधीशांचे कपडे चोरीला जात होते. चोरीची घटना सातत्याने घडत असल्यामुळे न्यायाधीश वैतागले होते. अखेर चोरट्याला पकडण्यासाठी त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचला.
वारंवार होत असलेल्या कपडे चोरीमुळे न्यायाधीश वैतागले होते. त्यांनी कपड्यांची चोरी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सापळा रचला. त्यानंतर चोरटा नेहमीप्रमाणे कपडे चोरायला आल्यानंतर न्यायाधीशांच्या कर्मचाऱाऱ्यांनी चोरट्याला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर चोरट्याला पोलिसात हजर करुन त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. न्यायालयात हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आहे.
चोरट्याने कपडे पळवल्याची घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे. सुशांत चव्हाण असं चोरट्याचं नाव आहे. दरम्यान, सामान्यत: चोरटे सोनं, मौल्यवान वस्तू, दागिने अशा वस्तुंची चोरी करतात. मात्र हा चोरटा सातत्याने न्यायाधीशांच्या फक्त कपड्यांचीच चोरी करत होता. या विचित्र चोरीमुळे कोल्हापुरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
इतर बातम्या :