चोरी करतानाही काही गोष्टींचे किमान ज्ञान आपल्याला हवे असणे का गरजेचे असते याचे एक मासलेवाईक उदाहरण घडले आहे. हरियाणात गेल्या शनिवारी एक अजब घटना घडली आहे. येथे एका बँकेत चोरट्यांना दरवाजा तोडून प्रवेश मिळविला. त्यानंतर एटीएम मशिन समजून चोरटे चक्क पासबुक प्रिंटिंग मशीन घेऊन पसार झाले. हरियाणा येथील रेवाडी जिल्ह्याच्या कोसली परिसरात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घुसलेल्या चोरांकडून हा विचित्र प्रकार घडल्याचे म्हटले जात आहे.
हरियाणा येथे गेल्या शनिवारी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ही अजब चोरीची घटना घडली आहे. चोराने खिडकी तोडून बँकेत प्रवेश मिळविण्यात यश मिळाले. या चोरांना बराच प्रयत्न करुनही बँकेच्या स्ट्राँग रुमचा दरवाजा काही उघडला गेला नाही. त्यामुळे सकाळ होण्याच्या घाईत त्यांनी जे मिळतेय ते चोरून नेण्याचा प्रयत्न केला. या घाई गडबडीत त्यांनी एटीएम समजून बँकेत लावण्यात आलेले तीन पासबुक प्रिंटर, चार बॅटरी आणि एक डीव्हीआर चोरी करुन नेले.
दुसऱ्या दिवशी बँकेचे कर्मचारी कामावर आल्याने या बँकेत चोरी झाल्याची वर्दी पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास केल्यानंतर चोरांची ही गडबडी उघडकीस आहे. बँकेची स्ट्राँग रुमचा दरवाजा काही केल्या उघडता न आल्याने त्यांनी तेथील काही सीसीटीव्ही देखील तोडले. खूप वेळी स्ट्राँग रुमचा दरवाजा उघडता न आल्याने अखेर त्यांनी पासबुक प्रिंटिंग मशीन चोरून नेल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. एटीएम समजून पासबुक प्रिटींग मशिन चोरून पाबोरा केल्याचे उघडकीस आली आहे.