सुनील ढगे, नागपूर : एटीएम (ATM machine) मधून पैसे चोरण्यासाठी चोरट्याने लावली नवीन शक्कल, एटीएम मधून ट्राजेक्शन करताना पैसे बाहेर यायला सुरवात होताच मशीन बंद करायचा आणि हाताने ओढून पैसे काढायचा, त्यामुळे अनेकदा बँकेची (bank cash) रोकड गायब व्हायची, बजाज नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस (nagpur police) आरोपीचा शोध घेत आहेत. नागपूरात प्रत्येकवेळी चोरटे चोरी करण्यासाठी नवी शक्कल लावत असल्यामुळे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत.
चोरट्याने नवीनच शक्कल लढवत चक्क एटीएमच्या साह्यानं पैसे काढले, पण पैसे खात्यातून डेबिट होऊ न देता बँकेला चुना लावल्याचा प्रकार उजेडात आला आहे. नागपूरच्या रामदास पेठेतील आरबीएल बँकेच्या एटीएममधून पैसे काढले आहेत. कार्ड एटीएम मध्ये टाकून ट्रानजक्शन सुरू करायचं आणि पैसे बाहेर निघायला सुरुवात होताच, ऐनवेळी ते एटीएम मशीन बंद करून पैसे ओढून घ्यायचे. त्यामुळे व्यवहार पूर्ण न झाल्याच दिसतं आहे. मात्र एटीएममधून पैसे कमी होत होते.
एकाचं पद्धतीनं एकाच दिवसात सात वेळा पैसे काढून बँकेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. सुरुवातीला बँकेचा व्यवहारात पैसे कमी झाल्याच लक्षात आलं. जेव्हा संपूर्ण व्यवहार सीसीटीव्हीत पाहायला मिळाला, त्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत बजाज नगर पोलिसांनी तपास सुरू केला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक, बजाज नगर पोलीस स्टेशन, प्रवीण पांडे यांनी दिली.