Nashik Crime : ऐन दिवाळीत नाशिक पोलिसांना चक्रावून टाकणाऱ्या काही चोरीच्या घटना समोर (Nashik Crime News) आल्या आहेत. नाशिक शहर आणि परिसरात तब्बल सहा क्रेटा कार चोरी (Car Theft News) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिक शहर हद्दीत विविध ठिकाणी कार चोरीच्या घटना समोर आल्यानंतर पोलीसांच्या निदर्शनास ही बाब आली आहे. विशेष म्हणजे कार चोरीच्या घटना दरम्यान चोरट्यांनी लावलेली शक्कल पोलिसांनाही चक्रावून टाकणारी आहे. विशेष म्हणजे चोरांनी नव्या कोऱ्या क्रेटा कारवरच लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये एक बाब सीसीटीव्हीच्या आधारे पोलीसांच्या निदर्शनास आली आहे जी की, क्रेटा कारचे सायरन न वाजताच कार लांबविल्या जात असल्याने त्यांच्या मोडस ऑपरेंडीवरच नाशिकमध्ये चर्चा होऊ लागली आहे.
नाशिकच्या पंडित कॉलनी परिसरात राहणाऱ्या सचिन ब्राह्मणकार यांच्या मालकीची एमएच १५ जीआर १९०८ ही कार मध्यरात्री चोरी केली होती.
त्यानंतर नाशिकच्या सातपूरच्या कामगारनगर परिसरातील काळे नगर येथील अनिल अंकुश काळे यांची क्रेटा कार त्यांच्या बंगल्यासमोर चोरी केली होती.
9 ऑक्टोबर ला घडलेली ही घटना ताजी असतांना अवघ्या चार तासाच्या अंतरावर राका कॉलनीतील व्यावसायिक सिल्केश कोठारी यांची क्रेटा कार चोरी केली आहे.
यानंतर चेहडी शिवारात आणि मखमलाबाद नाका परिसरात तसेच निफाड येथून ही क्रेटाच कार चोरीस गेल्याची घटना घडली आहे.
या घटना ताज्या असतांना 19 ऑक्टोबरला गंगापूर रोड शिवारातून शांती निकेतन कॉलनीतील प्रशांत उगले यांची घरासमोरुण मध्यरात्री क्रेटाच कार चोरी झाली होती.
या दरम्यान कार चोरीचा नवा पॅटर्न देखील समोर आला आहे, तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरुन आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
तीन ते चार संशयित एका कारमधून येवून आधीच क्रेटा कारची माहिती काढून ती उभी असल्याच्या ठिकाणी मागील बाजूची काच अलगद कटरने फोडून गाडीत प्रवेश करतात.