मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव, नाशिक : दिवसेंदिवस चोरीच्या (Nashik Crime News) नवनवीन पद्धती समोर येत आहेत. चोरांनी हायटेक पद्धतीवरुन चोरी करण्याचे धाडस केल्याचे समोर येत आहे. दुचाकी चोरीच्या घटना थांबायचे नाव घेत नसतांना आता चारचाकी (Car) चोरीच्या घटना समोर येत आहे. विशेषतः यामध्ये महागड्या वाहनांवर चोरट्यांनी लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यात विशेष बाब म्हणजे लॉक असलेली गाडी चक्क चोरटे चालू करून घेऊन जात असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहे. नाशिकच्या मालेगाव (Nashik Malegaon) येथे अभयकुमार जैन यांच्या कुटुंबाला मामाच्या घरी जाणं महागात पडलं आहे. उच्चभ्रू वस्तीतून अवघ्या पाच मिनिटांत चोराने चारचाकी गाडी चोरी केल्याचे समोर आले आहे. दुचाकी चोरण्यासाठी सोपी बाब असल्याने चोरटे दुचाकीवर लक्ष केंद्रित करतात. मात्र, आता चोरांनी चारचाकी वर लक्ष केंद्रित केल्याने पोलीस देखील चक्रावून गेले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
नुकतीच नाशिकमध्ये 8 लाखांची चारचाकी चोरट्याने चोरी केली आहे. मालेगावमधील 18 लाखांची गाडी चोरी होत नाही तोच नाशिकमधून 8 लाखांची चारचाकी गाडी चोरी झाली आहे.
विशेष म्हणजे दोन्हीही चारचाकी या अत्याधुनिक आहे. सेंट्रल लॉक आणि सुरक्षित उपकरणांचा समावेश असलेल्या गाड्या आहेत.
तरीही चोर दुचाकी सोडून आता चारचाकी गाडीवर लक्षकेंद्रित करत असून अवघ्या पाच मिनिटात गाडी चोरीकरून पळ काढत आहे.
नाशिकमध्ये मखमलाबाद परिसर येथून एक सात लाखाची गाडी चोरीला गेली आहे तर दुसरी गाडी गंगापूर रोड या परिसरातून चोरी झाली आहे.
नाशिक शहरातून दोन आणि मालेगाव येथून एक अशा तीन चारचाकी चोरी गेल्या आहे, त्यात गाडी मालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून चोरट्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही.
सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दरोडे, दुचाकी चोरीच्या घटनांची उकल करतांना पोलीसांच्या नाकीनऊ येत असतांना आता चारचाकी कशी चोरी होते याचा शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
बनावत किल्ली, लॉकस्पार्क करून, सेन्सर किटच्या माध्यमातून चोरी होत असल्याचा संशय नागरिकांना असुन पोलीसांच्या तपासात काय समोर येते याकडे तक्रारांचे लक्ष लागून आहे.