Kalyan Bike Theft : महागड्या दुचाकी चोरुन खोटे नंबरप्लेट लावायचे चोरटे, कल्याण क्राईम ब्रांचने मुसक्या आवळल्या

| Updated on: Aug 21, 2022 | 10:35 PM

कल्याण गुन्हे शाखा 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदशनाखाली प्रीमियर कॉलनी मानपाडा परिसरात सापळा रचत पोलिसांनी काशिमला अटक केले.

Kalyan Bike Theft : महागड्या दुचाकी चोरुन खोटे नंबरप्लेट लावायचे चोरटे, कल्याण क्राईम ब्रांचने मुसक्या आवळल्या
महागड्या दुचाकी चोरुन खोटे नंबरप्लेट लावायचे चोरटे
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : महागड्या दुचाकी चोरुन (Bike Stolen) खोटे नंबर लावणाऱ्या चोरट्याच्या कल्याण गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. काशिम युनूस अली (22) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून दोन मोटारसायकल आणि मोबाईल असा 2 लाख 15 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत (Seized) केला आहे. आरोपीचा अजून एक साथीदार असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. आरोपीवर कोळसेवाडी पोलीस ठाणे आणि शाहूनगर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी गाड्या कसे चोरायचे ? आणि याआधी आणखी किती चोऱ्या केल्या आहेत ? याची पोलीस चौकशी करत आहेत.

आरोपीकडून दोन मोटारसायकल जप्त

कल्याण डोंबिवली शहरात दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. याच अनुषंगाने कल्याण गुन्हे शाखा-3 कडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा तपास सुरू होता. यातील आरोपी मानपाडा शीळ रोड परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखाच्या पोलीस शिपाई गुरुनाथ जरक यांना मिळाली होती. कल्याण गुन्हे शाखा 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदशनाखाली प्रीमियर कॉलनी मानपाडा परिसरात सापळा रचत पोलिसांनी काशिमला अटक केले. आरोपीकडून दीड लाख रुपये किंमतीची R 15 मोटारसायकल आणि 55 हजार रुपये किंमतीची होंडा शाईन हस्तगत करण्यात आली आहे.

मटण शॉपमध्ये आरोपींची ओळख झाली

काशिमचा अन्य साथीदार अंकित कुमार शर्मा दोघांनी मिळून या मोटारसायकल चोरी केल्या. दोघेही कल्याणमधील एका मटण शॉपमध्ये काम करत होते. तेथेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. दोघेही मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. मटण शॉपमध्ये काम करत असताना चार-पाच महिन्यांपूर्वी दोघांनी नंदिवलीमधून R 15 मोटासायकल आणि मुंबई धारावी येथून शाईन मोटासायकल चोरी केली होती. बाईकची नंबर प्लेट काढून खोटी नंबर प्लेट लावून आरोपी बाईक चालवत होते. पोलिसांनी दोन्ही बाईक जप्त केल्या आहेत. (Thieves who stole expensive bikes and affixed fake number plates were arrested by the police)

हे सुद्धा वाचा