Video : काळ आला होता पण… ते दूत बनून धावून आले अन् हे थोडक्यात बचावले !

| Updated on: Oct 14, 2022 | 10:55 PM

मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोडनिंब शहरातील गाव ओढा ओव्हर दुथडी भरुन वाहत आहे. ओढ्यावरील पूल कमी उंची असल्याने पाण्याखाली गेला आहे.

Video : काळ आला होता पण... ते दूत बनून धावून आले अन् हे थोडक्यात बचावले !
काळ आला होता पण...
Image Credit source: TV9
Follow us on

संदीप शिंदे, TV9 मराठी, सोलापूर : परतीच्या पावसाने राज्यात थैमान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हाहाःकार माजवला आहे. नद्या तुडुंब भरुन वाहत आहेत. यामुळे छोट्या नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले असून यामुळे दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना (Incident) सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात (Madha taluka solapur) आज घडली आहे. शाळेत मुलांना घेऊन जाताना दुचाकीसह वडिल आणि दोन मुलं वाहून (Father and Children Rescued) जात होती. मात्र सुदैवाने त्यांना वाचवण्यात यश आले आहे.

मुसळधार पावसामुळे पूल पाण्याखाली गेला

मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोडनिंब शहरातील गाव ओढा ओव्हर दुथडी भरुन वाहत आहे. ओढ्यावरील पूल कमी उंची असल्याने पाण्याखाली गेला आहे.

पुराच्या पाण्यातून दुचाकी नेत असताना दुर्घटना

सकाळी शाळेची वेळ असल्याने एक व्यक्ती दुचाकीवरुन आपल्या दोन मुलांना शाळेत सोडायला चालला होता. पुलावरुन पुराचे पाणी वाहत असताना देखील या व्यक्तीने पुराच्या पाण्यात दुकाची नेली. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी वाहून जाऊ लागली.

‘त्या’ चौघांमुळे तिघांना जीवदान

यावेळी तेथे उपस्थित बाबासाहेब शेख यांनी मागचा पुढचा विचार न करता तात्काळ पाण्यात उडी घेत या तिघांना बाजूला ओढले. शेख यांच्या मागोमाग दत्ता चांदणे, शशिकांत ओहोळ आणि प्रतिक रोकडे यांनी मदतीसाठी पाण्यात उडी घेतली. यामुळे तिघा बाप-लेकरांचा जीव वाचला आहे.

पावसामुळे ओढ्याला पूर आला आहे. यामुळे पूल पाण्याखाली गेल्याने शाळकरी मुलांची मोठी पंचाईत झाली आहे. यामुळेच आजची दुर्घटना घडली आहे. मात्र चौघांनी पाण्यात उड्या घेत मोठ्या हिंमतीने तिघांना वाचवले आणि उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास टाकला.