पालघर : मानवतेला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील तलासरी येथे 3 वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बालिकेचे शुक्रवारी रात्री 12 वाजता अपहरण झाले होते. त्यांनतर ती वेदनेने विव्हळत पडलेली शेतात आढळली. दरम्यान, पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेलले असून या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील तलासरी येथे 3 वर्षीय बालिका आपल्या आईसोबत घरासमोरच्या ओट्यावर झोपली होती. यावेळी मुलगी जवळ नसल्याचे मुलीच्या आईला अचनाकपणे लक्षात आले. त्यांनतर मुलीच्या आईवडिलांनी तसेच शेजाऱ्यांनी बालिकेचा शोध घेणे सुरु केले. आजुबाजुला शोध घेतल्यानंतर ही 3 वर्षीय बालिका एका शेतात विव्हळत पडलेली आढळली. घरच्यांनी तिची परिस्थिती पाहता तिला तत्काळ तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर या बालिकेला पुढील उपचारासाठी डहाणू येथे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तलासरी पोलिसांनी घडलेल्या प्रकाराची दखल घेत गुन्ह्याची नोंद करुन घेतली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. पोलीस या संशयिताची कसून चौकशी करत आहेत.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात एका अडीच वर्षाच्या चिमुरडीची 30 डिसेंबर रोजी बलात्कार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे संपूर्ण पेण तालुका हादरला होता. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे जामिनावर सुटलेल्या नराधमानेच पुन्हा असे दुष्कृत्य केलं. मिळालेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील मळेघर वाडी इथल्या साबर सोसायटीमधील मोतीराम तलाव इथं आदीवासी वाडीत ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
चेन्नईतील आयटीसी ग्रँड चोला लग्झरी हॉटेल कोरोनाचा नवा हॉटस्पॉट, 85 जण पॉझिटीव्हhttps://t.co/CgAS18DHka#CoronaVirus #CoronaHotspot #ITCGrandChola
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 3, 2021
संबंधित बातम्या :
मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या, कारण ऐकून थक्क व्हाल!
रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या तन्वीला हुंड्यासाठी मारण्याचा प्रयत्न? सासरच्यांवर आरोप
हेड कॉन्स्टेबल महिलेचा मृतदेह 20 दिवस घरातच, आत्मा आला का परत? भयंकर