जोधपूर : राजस्थानमधील जोधपूरमध्ये थार कारच्या थरारक अपघाताची घटना घडली आहे. अनियंत्रित झालेली महिंद्रा थार भररस्त्यात गोल गोल फिरु लागले. यावेळी कारचे टायरही फुटले. या अपघातातील कारमधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेवेळी रस्स्त्यावर वाहने नसल्याने मोठा अपघात टळला.
मंगळवारी मध्यरात्री 2.16 वाजता जोधपूर शहरातील देवनगर परिसरात ही घटना घडली आहे. एक महिंद्रा थार गाडी भरधाव वेगात आली. गाडी इतकी अनियंत्रित झाली की 4-5 सेकंद गाडी रस्त्यावर गोल गोल फिरली.
#Jodhpur Mahindra #Thar Horrific Accident in Jodhpur, #CCTV Video.#ViralVideos #ACCIDENT pic.twitter.com/Qvlk0gfU3l
— VineetSharma (@vineetsharma94) November 30, 2022
इतकेच नाही गोल गोल फिरताना गाडीचे टायर देखील फुटले. तर दोन टायर निखळले. बोलेरोने मागून धडक दिल्याने थार अनियंत्रित झाली अन् ही घटना घडली, अशी माहिती मिळते.
सर्वसाधारणपणे अशा घटनांमध्ये गाडी पलटी होते. मात्र थार गोल गोल फिरल्यानंतर थार थांबली. विशेष म्हणजे एवढी भीषण घटना घडली असली तरी गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांना किरकोळ जखमा झाल्या.
अपघाताची ही थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गाडीमध्ये एक महिला आणि दोन पुरुष होते. हे तिघे रुग्णालयात दाखल असलेल्या आपल्या मित्राला बघण्यासाठी गेले होते. तेथून परतत असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील कार बाजूला केली आहे.