बिहारधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीचं दिवसाढवळ्या अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आलं. अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीला किडनॅपर्सनी उटलून, बेशुद्ध करून गाडीच्या डिक्कीत टाकलं होतं आणि गाडी सुरू करून त्यांनी पळ काढला. पण पुढे गेल्यावर असं काही झालं की ते चांगलेच अडकले आणि त्या मुलीनेही त्यांच्या तावडीतून जीव वाचवत पळ काढला. आई-बाबांना फोन करून तिने सगळी घटना सांगितली. तिने नेमकी कशी केली आपली सुटका ?
झालं तरी काय ?
रिपोर्ट्सनुसार, बिहारची राजधानी पाटणामध्ये ही घटना घडली आहे. तेथे बिहटा भागात शाळेत निघालेल्या चौथीतल्या मुलीचं अपहरण करण्यात आली. किडनॅपर्सनी तिला उचललं, बेशुद्ध करून गाडीच्या डिक्कीत टाकलं आणि ते निघाले. मात्र पुढे जाऊन त्यांची गाडी ट्राफिक जाममध्ये अडकून पडली. त्याचदरम्यान डिक्कीतली ती चिमुकली शुद्धीवर आली. डोकं चालवून तिने कशीबशी डिक्की उघडली आणि तिथून पळ काढत ती एका मॉलमध्ये जाऊन पोचली. तिथे जाऊन तिने कसाबसा आई-वडिलांना फोन लावत संपूर्ण प्रकार कथन केला.
या घटनेनंतर त्या विद्यार्थिनीच्या आईने बिहटा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या सांगण्यानुसार, त्यांना दोन मुली असून त्या चालत शाळेत जातात. ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा मोठी मुलगी आधीच शाळेत गेली होती तर छोटी लेक थोड्या उशिराने शाळेत निघाली. ती शाळेत पोहोचायच्या आधीच कारमधून काही माणसं आली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याने तिला थांबवलं तेवढ्यात दुसऱ्या आरोपीने तिच्या तोंडावर रुमाल ठेवत तिला कारच्या डिक्कीत कोंबलं.
पण पुढे जाऊन ती कार ट्राफिक जाममध्ये अडकली. माझ्या मुलीने डोकं चालवलं आणि कारची डिक्की उघडत ती बाहेर पडली आणि पळत जाऊन बाजारातील मॉल गाठून तिने कसाबसा फोन केला, तेव्हा आम्हाला हा सगळा प्रकार समजला. आम्ही मॉलमध्ये पोहोचलो आणि मुलीला सुखरूप परत आणले.
पोलिसांकडून तपास सुरू
बिहटा पोलीस ठाण्याचे प्रभारी राजकुमार पांडे यांनी सांगितले की, मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण संशयास्पद वाटत आहे. मार्केटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. कारची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.