वॉशिग्टन डीसी : हल्ली विमानप्रवासात एकापाठोपाठ विचित्र प्रकरणे घडण्याची मालिकाच सुरू आहे. विमानाचे इमर्जन्सी डोअर उघड्याचा प्रकार भारतात घडला होता. आता परदेशातही अमेरिका ते ब्रिटनला जाणारे विमान हवेत असताना एका प्रवाशाने अचानक इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न एका प्रवाशाकडून केला गेला. त्यामुळे केबिन क्रु मेंबर्स सावध झाले. या प्रवाशाला जाब विचारला असता त्याने असा काही विचित्र प्रकार केला की विमान जमिनीवर आले.
अमेरिकेतील लॉस एंजिल्सहून ब्रिटनच्या बोस्टनला जाणारे विमानात एका प्रवाशाला विमानाचा इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडल्याने सर्वांची पाचावर धारण बसली. या आरोपीला अखेर विमान उतरल्यावर अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव सेवेरा टोरेस असे असून तो ब्रिटनचा रहिवासी आहे, त्याच्या गुन्ह्यामुळे आता त्याला जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते असे म्हटले जात आहे.
विमानाचा अर्लाम वाजला
लॉस एंजिल्सहून बोस्टनला जाणाऱ्या युनायटेड एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये तो प्रवास करीत होता. लॅंडींगसाठी 45 मिनिटांचा अवधी होता. विमान हवेत 36 हजार फूटांवरून उडत होते. त्यावेळी अचानक सिक्युरिटी अलार्म वाजला आणि सर्वजण अर्लट झाले. विमान हवेत उंचावर असताना अचानक सिक्युरिटी अर्लाम वाजला त्यामुळे फ्लाईट क्रु धावत तेथे पोहचले. तेव्हा फ्लाईट क्रु मेंबरला तपास केला असता कोणी तरी फ्लाईटच्या इमर्जन्सी डोअरला हात लावल्याचे स्पष्ठ झाले. चौकशीत इमर्जन्सी डोअरचे लॉक जवळपास उघडल्यातच जमा होते. ज्यावेळी अर्लाम वाजला तेव्हा प्रवासी टोरेस तेथे संशयास्पदरित्या उभा होता अशी तक्रार क्रु मेंबरने कॅप्टनला केली.
अचानक तणाव आणि हाणामारी
विमानाचा अचानक जेव्हा अर्लाम वाजला तेव्हा फ्लाईट अन्टेडंटने टोरेस विमानाची आपात्कालिन दरवाजा उघडला तेव्हा तेथे घुटमळताना पाहीले होते. त्यामुळे इमर्जन्सी डोअरचे लॉक उघडल्याचे दिसत असल्याचे तपासात आढळले तेव्हा विमानात इमर्जन्सी डिक्लेअर झाली. टोरेस यांनी हात वर करीत आपण हे केलेच नाही असे सांगत हुज्जत घातली. हवेतर तुम्ही सीसीटीव्ही तपासा असे तो विमामातील कर्मचाऱ्यांना म्हणाला. परंतू त्याच्यावर विश्वास ठेवायला स्टाफ तयार नव्हता.
विमान प्रवाशाच्या हालचाली वाढल्या
संशयित प्रवासी टोरेस नंतर अन्य एका एक्झीट डोअर जवळ उभा राहिला. तेव्हा तेथे आधीपासूनच दोन क्रु हजर होते, त्यामुळे त्यांच्या पुन्हा बाचाबाची झाली आणि टोरेसने आक्रमक होत. टोरेसला ज्यावेळी घेरले तेव्हा दात तुटलेल्या फोर्कचा ( काटे चमचा ) चाकू सारखा वापर करीत क्रु मेंबरच्या मानेवर वार केला. त्यानंतर त्याला पकडण्यात आले. बोस्टन इंटरनेशनल एयरपोर्टवर विमान लॅंड झाल्यावर टोरेसला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. टोरेसवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यात जीवे ठार मारण्याच्या आरोपाचा समावेश आहे. त्यामुळे त्याला जन्मठेप देखील होऊ शकते असे म्हटले जात आहे.