सांगली : सांगलीच्या पोलीस मुख्यालया (Police Headquarter)तील ट्राफिक गार्डनमधून चंदनाची झाडे कापून नेल्याप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक (Arrest) केले आहे. अभिमन्यू आनंद चंदनवाले आणि रमेश भीमराव चंदनवाले अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सांगलीच्या वाढल्यास वाडी येथे दोघेजण चंदन (Sandalwood) विक्रीसाठी आले असताना ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र पोलीस प्रशासनाने चोराची धास्ती घेत तीन गेट बंद केले आहेत. तर चालू गेट समोर चेक पोस्ट उभा केला आहे. सांगली पोलीस मुख्यालयाच्या आवारातील चंदनाची झाडे चोरून नेण्याची ही दुसरी घटना आहे. याआधीही चोरट्याने चंदनाच्या झाडावर डल्ला मारला होता. आता आणखी हा प्रकार यामुळे सांगली पोलिसांनी प्रशासनाने चोराची धास्ती घेत तीन गेट बंद करण्यात आले आहेत. चालू गेट समोर चेक पोस्ट उभा केला आहे.
पोलीस मुख्यालयाच्या आवारातील गार्डनमध्ये 15 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दोघांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस कर्मचारी दीपक वडेर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली होती.
पोलीस मुख्यालयाच्या आवारातील गार्डनमध्ये 15 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास दोघांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलीस कर्मचारी दीपक वडेर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली होती. सांगलीच्या पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत ट्रॅफिक पार्कमधील चंदनाच्या झाडांची 17 जुलै रोजी चोरी केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस या चोरट्यांच्या मागावर होते. आज वाणलेसवाडी येथे चंदनाची विक्री करण्यासाठी दोघे जण येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तात्काळ वाणलेसवाडी येथे सापळा रचला. यावेळी पोलिसांना तेथे दोघेजण संशयास्पद आढळून आले आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 4 हजार किमतीचे तीन किलो 138 ग्रॅम वजनाचे चंदनाचे तुकडे हस्तगत करण्यात आले. दोघांची चौकशी केली असता पोलीस मुख्यालयाच्या आवारातून चंदनाची झाडे तोडून विक्री केल्याचे कबुली त्यांनी दिली आहे. (Two arrested in case of sandalwood theft from Sangli police headquarters)