बारामती: बारामतीमध्ये पती-पत्नीच्या वादात दोन लहानग्यांचा नाहक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि याच रागातून पत्नीने मुलांना पाण्याने भरलेल्या खदानीत फेकून दिले. यामध्ये दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. (Kids died due to husband and wife dispute)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बारामातीच्या पिंपळी गावात घडली. अंजली सुर्यवंशी आणि अतुल सुर्यवंशी या दाम्पत्यामध्ये गुरुवारी रात्री कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे अंजली सुर्यवंशी यांच्या संतापाचा पारा चढला. याच रागाच्या भरात अंजली सुर्यवंशी यांनी आपल्या पोटच्या मुलांना जवळच्या एका खदानीत फेकून दिले. त्यानंतर स्वत:ही खदानीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
पत्नी आणि मुले खदानीत पडल्याचे पाहताच अतुल सुर्यवंशी यांनीही खदानीत उडी टाकली. त्यांनी आपल्या पत्नीला खदानीच्या बाहेर काढले. मात्र, आपल्या दिव्या आणि शौर्य या दोन लहान मुलांचा जीव वाचवण्यात ते अपयशी ठरले.
पत्नीशी झालेल्या वादातून पतीने दीड वर्षीय मुलासह गळफास घेऊन आत्महत्या केल्या धक्कादायक घटना समोर आली आहे. दिनेश पुंडलिक वानखडे (26)असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कुंदेगाव आहे. या ठिकाणी दिनेश पुंडलिक वानखडे हे राहतात. दिनेश वानख़डे यांचे काल पत्नीशी जोरदार भांडण झाले. यानंतर दिनेश हा दीड वर्षाच्या चिमुकला रोशनला घेऊन कुंदेगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडाजवळ आला. त्यानंतर त्याने एका ओढणीच्या मदतीने रोशनला गळफास दिला. त्यानंतर स्वत: दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. पती-पत्नीच्या वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
संबंधित बातम्या :
तीन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज, पत्नीने शिवी दिल्याचा राग आला, पतीने गळा दाबून खेळच संपवला
(Kids died due to husband and wife dispute)