सातारा : नाशिकमधील (Nashik Crime News) एका तहसिलदाराचं प्रकरण ताज असताना सातारा (satara news) जिल्ह्यात आणखी एक प्रकरण उजेडात आलं आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे दोन पोलिस अधिकाऱ्यांनी एका प्रकरणात तडजोड करण्यासाठी लाखो रुपयांची मागणी केली होती. ही माहिती एनसीबीच्या पथकाला (NCB Team) मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ सापळा रचून दोन पोलिसांना रंगेहात ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या दोन पोलिस अधिकाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून एनसीबीकडून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना एक लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ताब्यात घेतलं आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक दत्तात्रय दराडे आणि सहाय्यक उपनिरिक्षक बापूसाहेब जाधव असं ताब्यात घेतलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची नावं आहेत.
अवैद्य दारू व्यवसाय करताना पकडलेल्या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी त्यांनी लाखो रुपयांची मागणी केली होती. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील दोन्ही अधिकारी असल्याची माहिती मिळाली आहेत. दोन्ही पोलिस अधिकारी औंध पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
ज्यावेळी तडजोड झाली, त्यावेळी दोन्ही अधिकाऱ्यांना लाखो रुपये देण्याचे ठरले होते. संबंधित व्यक्तीने ही माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना कळवली होती. त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली.
नाशिकमधील तहसीलदार घराच्या बाजूला लाखो रुपये घेत असताना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतला. त्या प्रकरणात रोज नवी माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळं अनेकजण चिंतेत आहेत.