2 दिवस, 2 मुलं आणि 2 हत्या.. क्रूर मुलांनी संपवलं जन्मदात्याचं आयुष्य !

| Updated on: Jun 14, 2023 | 1:07 PM

दोन दिवसांत झालेल्या दोन हत्यांमुळे खळबळ माजली आहे. दोन मुलांनी त्यांच्या वडिलांना निर्घृणपणे संपवल्याने सर्वच हादरलेत.

2 दिवस, 2 मुलं आणि 2 हत्या.. क्रूर मुलांनी संपवलं जन्मदात्याचं आयुष्य !
Follow us on

Crime news : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दोन दिवसांत दोन हत्या (two murders) झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन मुलांनी वडिलांची निर्घृण हत्या (son killed father) केली. पहिली घटना लालगंज पोलीस ठाण्याच्या शोभनपार गावची आहे, जिथे सोमवारी एका शिक्षकाच्या मुलाने वडिलांची कुदळीने निर्घृण हत्या केली.

दुसरी घटना सदर कोतवालीच्या पारसी गावची आहे. जिथे मालमत्तेच्या वादातून मुलाने आपल्याच वडिलांवर धारदार चाकूने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर मदतीसाठी आलेल्या आई व वहिनीवरही त्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना जखमी केलं आणि तो घटनास्थळावरून पळाला.

सदर कोतवालीच्या पारसी गावात राहणाऱ्या ७० वर्षीय गौरीशंकर चौधरी यांना मालमत्तेच्या वादातून त्यांचाच मुलगा विजय प्रकाश चौधरी याने प्रथम बेदम मारहाण केली आणि नंतर पोटात वार करून निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर आई आणि वहिनीवरही चाकूने वार करून जखमी केले. या हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी गौरी शंकर चौधरी यांना मृत घोषित केले. उर्वरित जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एएसपी दीपेंद्र चौधरी यांनी सांगितले की, पारसी गावात गौरीशंकर यांच्या हत्येची माहिती मिळाली होती, त्यानुसार घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. मृत गौरीशंकर यांनी काही दिवसांपूर्वी 2 एकर जमीन 15 लाखांना विकल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विजय हा त्या पैशांत हिस्सा मागत होता मात्र गौरीशंकर यांना ती संपूर्ण रक्कम त्यांचा लहान मुलगा सत्य प्रकाश याला द्यायची होती. याच गोष्टीवरून वाद होऊन मोठा मुलगा विजय याने वडील गौरीशंकर यांची निर्घृण हत्या केली.

या हल्ल्यात आई सुभावती आणि धाकट्या भावाची पत्नी मंजू यांनाही दुखापत झाली असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सध्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आरोपीला पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली असून, त्याला लवकरच अटक करण्यात येईल.