रुममध्ये पार्टी करत होता क्लबचा मालक, सफाई कर्मचाऱ्याने रुम स्वच्छ करण्यासाठी दरवाजा उघडताच धक्काच बसला !

| Updated on: Dec 20, 2022 | 8:58 PM

मिळालेल्या माहितीनुसार, नाईट रायडर क्लबचे मालक संजीव जोशी रविवारी आपल्या तीन मैत्रिणींसह क्लबमध्ये बर्थ डे पार्टी करण्यासाठी आले होते. यानंतर ते मैत्रिणींसह क्लबमधील रुममध्ये गेले.

रुममध्ये पार्टी करत होता क्लबचा मालक, सफाई कर्मचाऱ्याने रुम स्वच्छ करण्यासाठी दरवाजा उघडताच धक्काच बसला !
क्लब मालकाचा रहस्यमयरित्या मृत्यू
Image Credit source: Google
Follow us on

गुरुग्राम : मैत्रिणींसोबत रात्री उशिरापर्यंत रुममध्ये पार्टी करणाऱ्या क्लब मालकासह एका तरुणीचा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुग्राममध्ये घडली आहे. तर अन्य दोन तरुणींची प्रकृती गंभीर असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संजीव जोशी असे मयत क्लब मालकाचे नाव आहे. गुरुग्राममधील नाईट रायडर क्लबमध्ये ही घटना घडली आहे. शेकोटीच्या धुरामुळे श्वास गुदमरल्याने ही घटना
घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन मैत्रिणींसह बर्ड डे पार्टी करत होते

मिळालेल्या माहितीनुसार, नाईट रायडर क्लबचे मालक संजीव जोशी रविवारी आपल्या तीन मैत्रिणींसह क्लबमध्ये बर्थ डे पार्टी करण्यासाठी आले होते. यानंतर ते मैत्रिणींसह क्लबमधील रुममध्ये गेले. रुममध्ये त्यांनी शेकोटी पेटवली होती.

सफाई कर्मचाऱ्याने रुमचा दरवाजा उघडला असता घटना उघड

मध्यरात्री उशिरापर्यंत पार्टी करुन चौघेही रुममध्येच झोपले. सोमवारी सायंकाळी क्लबची सफाई सुरु होती. यावेळी सफाई करणारा कर्मचाऱ्याने रुमची स्वच्छता करण्यासाठी रुमचा दरवाजा उघडला असता आतमध्ये सर्वत्र धूर पसरला होता.

हे सुद्धा वाचा

दोघांचा मृत्यू, दोन तरुणींची प्रकृती अत्यवस्थ

कर्मचाऱ्यांनी याची माहिती संजीवचा भाऊ आणि क्लबचा मालक राजन जोशीला दिली. त्यानंतर राजनने तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी संजीव जोशीसह एका तरुणीला मृत घोषित केले तर अन्य दोन तरुणींची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज

प्राथमिक तपासात श्वास गुदमरल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहे. रुममध्ये भांडण, मारामारीचे काही पुरावे सापडले नाहीत, मात्र सर्व बाजूने तपास सुरु आहे.