उज्जैन | 29 सप्टेंबर 2023 : एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या निर्घृण अत्याचारामुळे उज्जैन शहर हादरून गेले. याप्रकरणातील संशयित आरोपी असलेल्या ऑटोरिक्षा चालकाला पोलिसांनी अटक केली. घडलेल्या गुन्ह्याचा तपास करताना आढावा घेण्यासाठी पोलिस त्याला घटनास्थळी घेऊन जात असातानाच, आरोपीने पोलिसांची नजर चुकवून पळून (tried to escape) जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच क्षणी त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं. त्याला रोखण्याच्या प्रयत्ना झालेल्या झटापटीमध्ये आरोपी आणि दोन पोलिस कर्मचारी जखमी (injured) झाले.
आरोपी पळून जात असताना पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांना त्याच्या पायावर गोळी झाडावी लागली. सध्या शहरातील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी चार रिक्षा चालकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांच्यापैकी एकाच्या रिक्षाच्या बॅकसीटवर रक्ताचे डाग पडलेले आढळले होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही चेक केले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
कसून केली चौकशी
भरत असे मुख्य आरोपीचे नाव असून ही घृणास्पद घटना घडली तेव्हा आपण मुलीसोबतच असल्याचे रिक्षाचालकाने मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. घडलेल्या गुन्ह्याचा आढावा घेण्यासाठी पोलिसांनी त्याला जीवनखेडी गावात घटनास्थळाच्या पाहणीसाठी नेले. मात्र तेथे आरोपीने पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्याला थांबण्याने आवाहन केले, मात्र तरीही आरोपी पळतच होता. अखेर त्याला रोखण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारली. रक्ताची चिळकांडी उडाली आणि जखमी झालेला आरोपी थेट खाली कोसळला. पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला पुन्हा बेड्या ठोकल्या आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.
हे सामूहिक अत्याचाराचे प्रकरण नाही याची पुष्टी झाली आहे. केवळ एकाच व्यक्तीने ( ऑटो चालक) हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
#WATCH | Ujjain minor rape case: Ujjain SP Sachin Sharma says, “When we were taking (the accused) to recreate the crime scene, the accused (Bharat Soni) tried to run away, during which he also got injured and our police officials also got injured. Necessary action is being taken… pic.twitter.com/9Bwr11YBQV
— ANI (@ANI) September 28, 2023
हादरलं संपूर्ण शहर
काही दिवसांपूर्वी उज्जैन शहरात एक अल्पवयीन मुलगी अर्धवस्त्रावस्थेत दारोदार मदत मागत भटकत असल्याचा व्हिडीओ व्हायरला झाला होता. तिच्या अंगावर रक्ताचे डाग होते आणि परिस्थितीही भीषण होती. मात्र तिच्या मदतीसाठी कुणीच पुढे आले नाही. अखेर एका इसमाने तिला कपडे देत मदत केली आणि पोलिसांना या घटनेबाबत कळवले. पीडित मुलगी दारोदार भटकत असल्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्याने या घटनेबाबत सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केल्यावर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अत्याचारामुळे ती अतिशय घाबरलेली होती. तिला समजावण्यासाठी, बोलतं करण्यासाठी समुपदेशकही बोलावण्यात आले. अखेर त्या मुलीने तिची माहिती सांगितली असून ती मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्याची रहिवासी असल्याचे समजते. उज्जैन पोलिसांनी या दुर्दैवी प्रकाराबाबत तिच्या कुटुंबियांना कळवले असून तिला भेटण्यासाठी तिचे आजोबा लवकरत इंदोर येथे पोहोचतील अशी माहिती मिळत आहे.
ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांचे मध्य प्रदेश सरकारवर टीकास्त्र
27 सप्टेंबर रोजी, अल्पवयीन मुलीचा मदतीची याचना करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संपूर्ण देश हादरला होता. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकारण्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न विचारत त्यांनी मध्य प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले.