बस्ती : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा 24 तासानंतर झाला आहे. शिवीगाळ, टोमणे याला कंटाळून दीरानेच तिची गळा चिरून हत्या केल्याचं उघड झालं आहे. सदर महिलेची हत्या करून तिचं शव मोहरीच्या शेतात लपवून ठेवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. वहिनीचे टोमणे आणि शिव्यांना वैतागून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय कुमार यादव 18 मार्च 2023 रोजी रात्री साडे दहा वाजता शेताची राखण करण्यास गेला होता. जवळच मृत वहिनीचं शेत आहे आणि तीही तिथेच होती. दीरा पाहता क्षणीत महिलेनं शिव्या आणि टोमणे मारण्यास सुरुवात केली. तिला गप्प राहण्यास सांगितलं असतान तिने विटा फेकण्यास सुरुवात केली.
आरोपी अजयला या कृतीमुळे राग अनावर झाला आणि तो वहिनीच्या दिशेने विटांचे तुकडे घेऊन धावला. तीने तेव्हा घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला पकडलं आणि जमिनीवर पाडून डोक्यात विट घातली. मग तिच्या हातातील विळा घेऊन तिचा गळा चिरला.
महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं पाहून अजय घाबरला आणि पुरावा लपवण्यासाठी धडपड सुरु झाली. शर्टाला लागलेला रक्ताचे डाग लपवण्यासाठी ते जाळून टाकलं. तसेच घरी आल्यानंतर रात्रभर झोपला नाही. दुसऱ्या दिवशी संतकबीर नगरला जात असताना पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं असावं याचा आम्ही तपास करत होतो. तसा घटनास्थळी कोणताच पुरावा नसल्याने आम्हाला नातेवाईकावर संशय आला. तो तीचा दीर होता आणि त्यांच्यात वाद होता. त्यामुळे मृत महिला त्याला टोमणे मारायची. त्यामुळे त्याने तिची हत्या केली.” याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय कुमार यादवला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.
आरोपी अजय कुमारनं सांगितलं की, माझ्या बहिणीचं लग्न वहिनीमुळे जमत नव्हतं.त्यामुळे नाराज झालो होतो. तीन वेळा नवऱ्याकडच्या मंडळींना भडकवून लग्न मोडलं होतं.