मूल होत नाही म्हणून आपल्याच सूनेला दीराशी संबंध ठेवण्यासाठी एका सासूने (Mother in law) बळजबरी केली. उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh crime news) ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नाला सात वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्यानं सासरच्यांनी हे घृणास्पद कृत्य केलं. आपल्याच सूनेला चुलत दिराच्या आणि मामाच्या ताब्यात दिल्याचा आरोप पीडित सूनेनं केलंय. मामा आणि दिराने सूनेवर बलात्कार केला. त्यानंतर सुनेला घरातच कैद करुन ठेवण्यात आलेलं. याप्रकरणी पोलिसांनी (Uttar Pradesh Police) पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. पीडित सून जेव्हा तिच्या भावासह माहेरी आली, तेव्हा तिनं आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीनुसार सासू, दोन मेव्हणे, पती यांच्यासह दोघा भावजयींविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस सध्या या संपूर्ण घटनेप्रकरणी तपास करत आहेत. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यामधील या घटनेनं सगळेच हादरुन गेलेत.
सात वर्ष लग्नाला होऊनही दाम्पत्याला मूलबाळ झालं नव्हतं. सासू नातवासाठी सूनेकडे हट्ट करत होती. सारखी टोमणे मारयची. आपला पती गर्भधारणेसाठी सक्षम नाही, असं सूनेनं सासूला सांगितलं होतं. पण निर्दयी सासूने आपल्याच सूनेला चुलत दिरासह खोलीत बंद केलं. मूल होण्यासाठी दिराशी शारीरिक संबंध ठेव असं म्हणत सासूने सुनेवर बळजबरी केली होती.
पीडित सूनेचं लग्न 8 मार्च 2014 रोजी झालं होतं. बांदा जिल्ह्यातील कोतवालीमध्ये हे लग्न झालं. लग्नाला सात वर्ष झाल्यानंतरही मूल होत नसल्यानं सासरचे सूनकडे तगादा लावून होते. अखेरीस 17 नोव्हेंबर 2021 रोजी सासूने वंश चालवण्यासाठी सूनेला घृणास्पद कृत्य करण्यास भाग पाडलं.
चुलत दिलासह मला एका खोलीत सासूने बंद केलं आणि त्याच्यासोबत मूल व्हावं यासाठी लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली, असा आरोप करण्यात आलाय. सलग काही दिवस हाच प्रकार सुरु असल्याचं पीडितेनं तक्रारीत म्हटलंय. ही बाब पतीला सांगितल्यानंतर त्यानेही या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं. आई सांगतेय तसं कर, असं म्हणत पत्नीच्या आरोपांकडे पतीने कानाडोळा केला.
दरम्यान, ही घटना घडून गेल्यानंतर जेव्हा वर्षभराने पीडित सून आपल्या माहेरी परतली. भावासोबत माहेरी परतल्यानंतर तिनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. तेव्हा हे सगळं प्रकरण उघडकीस आलं. आता कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवल्या. बलात्कारासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पतीचे दोन्ही भाऊ, सासू, वहिनी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस या संपूर्ण घटनेप्रकरणी अधिक तपास करत आहेत.