लखनऊः एका लग्नात नवऱ्याला हुंड्यामध्ये दिलेली कार नातेवाईकांसाठी मात्र दुःखद घटनाच ठरली आहे. उत्तर प्रदेशातीला इटावा जिल्ह्यातील इकदिल परिसरात लग्नाचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी सर्व नातेवाईक लग्नाला उपस्थितही होते. त्यावेळी पाहु्ण्यांच्या उपस्थितीत नवऱ्याला हुंड्यामध्ये कारही देण्यात आली. लग्नात हुंड्यामध्ये ज्यावेळी कार देण्यात आली त्यावेळी सगळे वऱ्हाडी मंडळी जेवायला बसलेली होती. नवऱ्याला कार दिल्यानंतर ती कार बघण्यासाठी सगळेच उत्सुक होते.
त्यानंतर त्या आनंदात वऱ्हाड्यांनी डीजे लावून नाचत होते. त्यावेळी कारची पूजाही करण्यात आली होती. त्याचवेळी नवऱ्याला ड्रायव्हिंग सीटवर बसवून त्याला कार चालू करुन देण्यात आली होती.
ज्यावेळी नवऱ्याला कारच्या ड्रायव्हर सीटवर बसवण्यात आले त्यावेळी कार सुरू करण्यात आली आणि त्याचा कारवरील ताबा सुटला. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कार वऱ्हाडी मंडळीमध्ये घुसून पाहुण्यांच्याच घरात घुसली.
हा अपघात इतका भयानक होता की, त्यामध्ये नवऱ्याच्या मावशीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर जखमी मावशीला रुग्णालयात घेऊन जात असतानाच वाटेत त्यांचा मृ्त्यू झाला. यामध्ये अनेक नातेवाईकही जखमी झाले आहेत.
विवाहामध्ये कार दिल्यानंतर कारची पूजा करण्यात येत होती. त्यावेळी नवरा कारमध्येच बसला होता. त्यावेळी त्यांच्या मेव्हण्याने त्यांना कार सुरू करण्यासा सांगितली. कार सुरू झाल्यानंतर मात्र कारवरील नवऱ्याचा ताबा सुटल आणि कार वऱ्हाडात घुसली. त्यामुळे सगळा गोंधळ उडाला. या अपघाता अनेक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र याबाबत कोणीही तक्रार दाखल केली नाही. विवाह समारंभातील अनेक जण जखमी झाले असल्याने अनेकांना हा धक्का बसला आहे.