माणूसच नव्हे इथं माणुसकीचा खून! उत्तर प्रदेशात रक्त गोठवणारी घटना, बलात्कारानंतरही ते थांबले नाहीत….

| Updated on: Sep 20, 2022 | 1:04 PM

Pilibhit Rape and Murder Case : 7 सप्टेंबरला 16 वर्षांची ही युवती अत्यंत गंभीर अवस्थेत आढळून आली. ती जवळपास 80 टक्के भाजली होती. 10 सप्टेंबरला पीडितेचा एक व्हिडीओदेखील समोर आला. या व्हिडीओच्या माध्यमातून पीडितेनं आपल्यासोबत नेमकं काय घडलं, हे सांगितलं होतं.

माणूसच नव्हे इथं माणुसकीचा खून! उत्तर प्रदेशात रक्त गोठवणारी घटना, बलात्कारानंतरही ते थांबले नाहीत....
खळबळजनक घटना...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

उत्तर प्रदेशाच्या (Uttar Pradesh Crime News) पिलीभीतमध्ये घडलेल्या बलात्काराच्या (Pilibhit Gang rape and murder) खळबळजनक घटनेनंतर आता एका दुर्दैवी बातमी समोर आलीय. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या बलात्कार पीडितेवर (Rape Victim) रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 12 दिवसांपासून ती मृत्यूशी झुंजत होती. ही झुंज अपयशी ठरलीय. अखेर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सोमवारी उपचारादरम्यान पीडितेननं अखेरचा श्वास घेतला, त्यामुळे हळहळ व्यक्त केली जातेय. दोघा नराधमांनी या 16 वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता.

पिलीभीतच्या माधोटांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुवरपूर इथं ही थरकाप उडणारी घटना घडली. 7 सप्टेंबर रोजी राजवीर नावाचा एक इसम आपल्या साथीदारासह एका 16 वर्षांच्या मुलीच्या घरात घुसला. या मुलीच्या घरात कुणीही नाही, हे पाहून नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कार करुनच हे नराधम थांबले नाहीत, तर त्यानंतर त्यांनी या मुलीला मारहाणही केली. शेवची तिच्या अंगावर डिझेल टाकलं आणि तिला जिवंत पेटवून दिलं. यानंतर पीडिता तडफडत असल्याचं पाहून दोघांनीही तिच्या घरातून पळ काढला.

हे सुद्धा वाचा

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

7 सप्टेंबरला 16 वर्षांची ही युवती अत्यंत गंभीर अवस्थेत तिच्या घरात आढळून आली. ती जवळपास 80 टक्के भाजली होती. 10 सप्टेंबरला पीडितेचा एक व्हिडीओदेखील समोर आला. या व्हिडीओच्या माध्यमातून पीडितेनं आपल्यासोबत नेमकं काय घडलं, हे सांगितलं होतं.

‘दोघांनी माझ्यावर बलात्कार केला, त्यानंतर मला ठार मारण्यासाठी माझ्यावर डिझेल ओतून मला पेटलून दिलं’, असं पीडिता व्हिडीओमध्ये सांगताना दिसलीय. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत पुढील कारवाई केली. दोघा नराधमांना पोलिसांनी शोधून काढलं ाणि त्यांना अटकही केली.

सोमवारी उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर आता हळहळ व्यक्त केली जातेय. सोमवारी पीडितेचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला. रात्री उशिरा पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. या संतापजनक घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केलीय. तसंच आम्हाला धमक्या येत आहेत, त्यामुळे पोलीस संरक्षण दिलं जावं आणि 50 लाख रुपयांची मदतही मिळावी, असं पीडितेच्या कुटुंबीयांचं म्हणणंय.

सध्या पोलिसांनी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोघाही आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलीय. कलम 376, 307, 504 आणि 506 सोबतच पॉक्सो कलमांतर्गत नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता पीडितेच्या मृत्यूमुळे 307 कलमाऐवजी 302 कलम आरोपींवर लावण्यात आलंय.