उत्तर प्रदेश : 18 वर्षांच्या तरुण भाजी विक्रेत्यावर पाय गमावण्याची वेळ ओढावली. पायावरुन रेल्वे धडधडत गेल्यामुळे तरुणाने आपले दोन्ही पाय गमावलेत. ही दुर्दैवी घटना लखनौमध्ये घडली. लखनौच्या कानपूरमध्ये एका पोलिसाने भाजीविक्री करणाऱ्या तरुणाचा वजनकाटा रेल्वे रुळांवर फेकून दिला होता. ज्यावर पोट चालतं, तो वजन काटा घेऊन येण्यासाठी तरुण रेल्वे रुळांच्या दिशेने धावला, पण इतक्यात आलेली भरधाव ट्रेनची धडक या तरुणाला बसली. या दुर्दैवी घटने तरुणाला आपले पाय गमवावे लागल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय.
कानपूर पोलिसांकडून अतिक्रमणविरोधी कारवाई केली जात होती. कानपूर रेल्वे स्टेशन परिसरात ही कारवाई पोलीस करत होते. त्यावेळा एका तरुण भाजी विक्रेत्याला पोलिसांनी हटकलं. त्या दरम्यान, ही घटना घडली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, साहिब नगर परिसरात राहणारा एक 18 वर्षीय तरुण भाजीविक्रीचं काम करुन आपलं घर चालवतो. जीटी रोड इथं त्यानं भाजी विक्रीचं आपलं सामान वालं होतं. त्यावेळी काही पोलीस त्याच्या जल आले. या तरुणाला दोघा पोलिसांनी मारहाण केली आणि त्यानंतर त्याच्या जवळील वजन रेल्वे रुळांवर फेकून दिलं. या तरुणाचं नाव अर्सलान असल्याची माहिती समोर आलीय.
वजनकाटा रेल्वे रुळांवर फेकल्यानं अर्सलान तो उचलण्यासाठी रेल्वे रुळांच्या दिशेनं धावला. नेमकी त्याच वेळ रेल्वे भरधाव वेगानं येत होती, याचंही त्याला भान राहिलं नाही. अखेर ज्याची भीती होती, तेच झालं.
अर्सलान याचे पाय रेल्वेखाली आले. या अपघातामुळे तो रेल्वे रुळांवरच विव्हळत होता. काही जणांनी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या तरुणासोबत झालेल्या घटनेनं हळहळ व्यक्त केली जातेय.
या घटनेची नोंद पोलिसांनीही घेतली आहे. हेड कॉन्स्टेबल यांनी बेजबाबदारपणे तरुणासोबत जी वागणूक केल्या, त्या प्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलीय.
During an anti encroachment drive in UP’s Kanpur, cops from Kanlyanpur PS allegedly threw weighing scales of street vendor Arslaan on railway track. He was hit by a train & lost both legs when he went on track to collect his items. pic.twitter.com/R8dodZe1V8
— Piyush Rai (@Benarasiyaa) December 2, 2022
या घटनेचे स्थानिकांनी जे व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत, त्याच्या आधारे आता पुढील तपास केला जात असल्याचंही सांगण्यात आलं. निलंबन करण्यात आलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबलचं नाव राकेश कुमार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.