सोलापूर : सोलापुरातील विशाल फटे स्कॅम (Vishal Phate Barshi) सध्या गाजतोय. या प्रकरणी अखेर विशाल फटे हा स्वतःहूनच पोलिसांना शरण आला होता. यानंतर आता त्याची कसून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून धक्कादायक बाबींचा उलगडा व्हायला सुरुवात झाली आहे. आरोपी विशाल फटे यांना गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून (Share Market) मोठा परतावा देण्याचं आमीष दाखवलं होतं. लोकंही विशाल फटेच्या आमीषाला बळी पडली होती. त्यानं दाखवलेल्या आमीषातून लोकांनी त्यांच्या आपल्या कमाईचे पैसे गुंतवणूक करण्यासाठी दिले. यातून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या विशाल फटेनं शेअर बाजारात गुंतवणूक केलीच नसल्याचं समोर आलं आहे. चौकशीअंती त्यांनं शेअर्समध्ये (Shares) कोणतीच गुंतवणूक केली नसल्याची माहिती उघड झाली असल्यामुळे लोकांना आमीषं दाखवून नेमकं तो त्यांचे पैसे दामदुप्पट देण्याचं आश्वासन कशाच्या जोरावर देत होता, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
आरोपी विशाल फटे यांची सध्या सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून धक्कादायक बाबी समोर आणल्या असून विशाल फटे स्कॅमबाबतचा गुंता आता आणखी वाढवला आहे. विशाल फटे हा लोकांकडून घेतलेले पैसे शेअर्समध्ये गुंतवतच नव्हता अशी माहिती आता चौकशीअंती समोर आली आहे. विशाल फटे हा एकाकडून पैसे घेऊन ते दुसऱ्यांना द्यायचा, असं चौकशीतून उघड झालं आहे. आठ दिवसांच्या चौकशीतून ही बाब समोर आली असून आता फटे स्कॅम प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची चिन्ह आहेत. जर शेअर्समध्ये पैसे कधीच गुंतवले नाहीत, तर मग नेमकं विशालले लोकांच्या पैशांचं केलं काय, असाही प्रश्न आता विचारला जातो आहे.
18 जानेवारीला विशाल फटे याला कोर्टात हजर करुन त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनाण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी त्याला पोलिसांनी न्यायालसमोर हजर केलं असता त्याची न्यायालयीन कोठडीत आता रवानगी करण्यात येणार आहे. तीन महिन्यांत दुप्पट पैसे देण्याचं आमीष दाखवून विशाल फटेनं लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
फक्त विशाल फटेच नाही तर त्याची आई, वडी, भाऊ आणि पत्नीवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत बार्शी शहर पोलीस ठाण्यात 85 तर आर्थिक गुन्हे शाखेकडे 21 असे एकूण 106 तक्रारी अर्ज विशाल फटेविरुद्धात दाखल झाले आहेत. या तक्रारींवर विशाल फटेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता न्यायालयीत चौकशीतून विशाल फटे स्कॅमप्रकरणी काय अधिक उलगडा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हत्या केली, मृतदेह गोणीत बांधला! पण अर्धवट फाटलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या कागदानं गेम फिरवला
अनेक दिवसांपासून दोघांमध्ये वाद, अखेर पतीनेच पत्नीला संपवलं, कोल्हापुरात खुनाचा थरार
अक्कलकोटला देवदर्शनासाठी निघाले, वाटेत ट्रकची मागून धडक, कारमध्ये लहान बाळ होतं, त्याचं काय झालं?