Uran : 14 वर्षीय मुलाचा पाच वर्षीय मुलीवर बलात्कार, उरण मधील धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ

| Updated on: Feb 17, 2023 | 11:13 AM

मुलीची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून मुलीचा आणि तिच्या कुटुंबियांची सुध्दा पोलिस चौकशी करणार आहेत. विशेष म्हणजे मुलीचं वय पाच वर्षे असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Uran : 14 वर्षीय मुलाचा पाच वर्षीय मुलीवर बलात्कार, उरण मधील धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ
uran crime news
Image Credit source: Google
Follow us on

उरण : अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्यामुळे संपुर्ण उरण (Uran) हादरलं आहे. मुलाने कृत्य केल्यानंतर चिमुकलीने तिच्या आईला या सगळ्या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर मुलीच्या आईने थेट पोलिस स्टेशन (Uran Police Station) गाठलं, त्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मुलाची चौकशी सुरु असून त्याच्या कुटुंबियांची सुध्दा चौकशी करण्यात येणार आहे. मात्र घडलेल्या घटनेमुळे उरण परिसरात (uran crime news) एकच खळबळ उडाली आहे.

मुलीची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून मुलीचा आणि तिच्या कुटुंबियांची सुध्दा पोलिस चौकशी करणार आहेत. विशेष म्हणजे मुलीचं वय पाच वर्षे असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

नेमकं काय झालं

उरणमधील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक अल्पवयीन 14 वर्षीय मुलाने शेजारी राहणाऱ्या एका 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्याबाबत तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पीडित मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितल्यावर आईने उरण पोलीस ठाण्यात येऊन सदर मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरू आहे. मात्र या घटनेमुळे उरण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

शेजारच्या लोकांवर विश्वास कसा ठेवायचा

महाराष्ट्रात आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अल्पवयीन मुलांना सुधारवस्तीगृहात पाठवण्यात आले आहे. भयानक अशी प्रकरण उजेडात येत असल्यामुळे शेजारच्या लोकांवर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.  उरणमधील घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.