महाराष्ट्र : मागच्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात युरीयाचा (Urea black market) काळाबाजार झाल्याची माहिती निफाड पोलिसांच्या (nifad police) कारवाईत उघडकीस झाली आहे. या प्रकरणातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर जे आरोपी फरार आहेत, त्याचा निफाड पोलिस शोध घेत आहेत. विशेष म्हणजे फरारी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आदिनाथ कृषी सेवा केंद्र आणि शेलार ऍग्रो या दोन दुकानांच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ज्यावेळी कारवाई केली, त्यावेळी त्यांना युरियाच्या साडेपाचशे गोणी सापडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय कनेक्शन (maharashtra news) असल्याचा पोलिसांना संशय आला आहे.
महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून युरियाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार झाल्याचं पोलिसांच्या कारवाई दरम्यान स्पष्ट झालं आहे. त्याचबरोबर युरिया खताच्या काळाबाजारा पाठीमागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासुर स्टेशन येथून हजारो गोण्या युरिया खत भारताबाहेर गेल्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत. त्याचबरोबर लासुर स्टेशन येथून भिवंडी आणि भिवंडीतून युरिया खत भारताबाहेर गेल्याची शक्यता आहे.
भारतातून काळ्याबाजारात गेलेल्या खताचा देश विघातक कृत्यासाठी वापर होत असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे निफाड पोलिसांच्या कारवाईनंतर धक्कादायक कृत्य उजेडात आलं आहे.
साडेपाचशे गोण्या युरिया खत जप्त केलं आहे. त्याचबरोबर लासुर स्टेशन येथील दोन खत व्यापाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. आदिनाथ कृषी सेवा केंद्र आणि शेलार ऍग्रो या दोन दुकानांच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. भिवंडी येथील व्यापारी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली. युरिया खताच्या काळाबाजारा पाठीमागे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची शक्यता पोलिस व्यक्त करीत आहेत.