US Woman Allegedly Murdered Husband : पतीच्या हत्येनंतर पत्नीने जोरदार पार्टी केली. ही गोष्ट ऐकायला जितकी विचित्र वाटते तितकीच प्रत्यक्षात ही घटना आश्चर्यकारक आहे. सातासमुद्रापलीकडील अमेरिकेच्या कामासमधून ही धक्कादायक घटना समोर आली. सॉल्ट लेक ट्रिब्यूनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, कौरी डार्डन रिचिन्स असे त्या महिलेचे नाव असून तिच्यावर तिच्या पतीच्या हत्या केल्याचा आरोप आहे. एवढंच नव्हे तर तिने पतीची हत्या केल्यानंतर तिने मित्रांसोबत मजा मस्ती कर पाट्हीही केल्याचे समजते.
पतीच्या व्होडका मध्ये मिसळले विष
कौरीला पोलिसांनी 4 मार्च 2022 रोजी पतीला विष दिल्याच्या आरोपावरून अटक केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौरी डार्डन रिचिन्सने पती एरिकला विष देऊन ठार केले. एनबीसीच्या रिपोर्टनुसार, कौरीने हत्येच्या एक दिवस आधी एरिकसोबत घरी पार्टीही दिली होती. आणि त्या रात्री खूप मजा केली. आणि त्याच उत्सवादरम्यान, कौरीने तिच्या पतीच्या व्होडकातून विष दिले.
पुस्तकातून दु:ख व्यक्त केले
खरं तर, पती एरिकच्या हत्येचा आरोप असलेली कौरी ही व्यवसायाने लेखक आहे. आणि तिच्या पतीच्या मृत्यूनंतर एक वर्षानंतर तिने एक पुस्तक लिहिले. उटाहमध्ये राहणाऱ्या कौरीने मुलांसाठी लिहिलेल्या त्या पुस्तकात तिचीही व्यथा मांडली आणि मृत्यूनंतरच्या दु:खाला कसे सामोरे जायचे हे लिहिले.
शवविच्छेदनात खुनाचे रहस्य उलगडले
जेव्हा एरिकची प्रकृती बिघडायला लागली तेव्हा कौरी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयतन केल्याचे नाटक केले. परंतु एरिकचा मृत्यू फेंटॅनाइलच्या अतिसेवनाने झाल्याचे शवविच्छेदनात नंतर स्पष्ट झाले. एरिकने फेंटॅनाइल गोळ्यांचे पाचपट सेवन केल्याचे समोर आले ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, हेही वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले.
पतीला गोळी दिल्यानंतर तिने स्वत:ही घेतली औषधे
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, कोर्टात दिलेल्या कागदपत्रांनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये महिलेने कोणाकडून तरी वेदना कमी करण्यासाठी गोळी घेतली होती. पतीला त्या गोळ्या दिल्यानंतर रिचिनने ड्रग्जही घेतले. त्यानंतर दोघांनी एकत्र जेवण केले पण त्यानंतर एरिकची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दोन आठवड्यांनंतर, एरिकने पुन्हा फेंटॅनाइलच्या गोळ्या घेतल्या आणि त्यानंतरच एरिकचा मृत्यू झाला.
स्वतः पोलिसांना फोन केला
पण पोलिस तपासात असे समोर येत आहे की एरिकला फेंटॅनाइलच्या गोळ्या इतर कोणी नाही तर कौरीने स्वतः दिल्या होत्या. तिला कोणत्याही किंमतीत आपल्या पतीपासून मुक्त व्हायचे होते. दोघांमध्ये अनेक भांडणे झाली होती जी त्याच्या मित्रांनी सोडवली. रिपोर्टनुसार, 4 मार्चच्या रात्री कौरीने पोलिसांना फोन केला आणि औषध घेतल्यानंतर एरिन प्रतिसाद देत नसल्याची तक्रार केली.
तीन मुलांच्या आईवर गंभीर आरोप
तीन मुलांची आई असलेल्या कौरीला आता पोलिसांकडून न्यायालयात हत्येच्या आरोपाला सामोरे जावे लागणार आहे. खरं तर, कौरीवर हत्येचा गंभीर आरोप आहे आणि कौरीने आपली कृती लपवण्याचा आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असाही आरोप आहे. याशिवाय कौरीवर पोलिसांचा आरोप आहे की ती ड्रग्जही ठेवते. तिच्याकडून परवानगीपेक्षा कितीतरी अधिक रक्कम जप्त करण्यात आली.