लखनऊ : अलिगढच्या (Aligarh) एका गावात जनावरांसाठी चारा घेण्यासाठी गेलेल्या एका (Uttar Pradesh Aligarh Girl Found Dead In Jungle) मुलीचा मृतदेह जंगलात मिळाल्याने एकच खळबळ माजली. ही घटना अकराबाद ठाण्याअंतर्गत एका गावात घडली आहे. येथे 17 वर्षांची अल्पवयीन मुलगी दुपारी जनावरांसाठी चारा घेण्यासाठी (Animal Food) जंगलात गेली होती. मात्र, उशिरापर्यंत जेव्हा मुलगी घरी परतली नाही, त्यामुळे तिचं कुटुंब चिंतेत पडलं. गावकऱ्यांसोबत या मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र ती कुठेही सापडली नाही (Uttar Pradesh Aligarh Girl Found Dead In Jungle).
A girl found dead in agricultural field in Aligarh
“Victim went out to get grass. Family started looking for her after she didn’t return home for few hours & found her body in field. Body sent for post mortem. We’ve formed 5 teams for investigation. Probe on,” said police(28.02) pic.twitter.com/7elNYqioDA
— ANI UP (@ANINewsUP) February 28, 2021
काही वेळानंतर मुलीचा मृतदेह (Dead Body) जंगलात आढळून आली. कुटुंबाने घटनेची माहिती पोलिसांना दिली. एसएसपी मुनिराज यांनी सांगतिलं की, पोलिसांना माहिती मिळाली होती की अलिगढमध्ये अकराबाद परिसरातील किवलास गावात एका मुलीचा मृतदेह शेतात मिळाली आहे. मुलगी सकाळी 10 वाजता आपल्या घरातून निघाली होतीपण सायंकाळी 4 वाजेपर्यंत ती परत आली नाही. गावकऱ्यांनी शोध घेतला असता मुलीचा मृतदेह जंगलात आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या संपूर्ण टीम घटनास्थळावर पोहोचली. घटनेच्या तपासासाठी पाच टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी बलात्कार करुन हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकेल. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलगी चारा घेण्यासाठी शेतात गेली होती. पण, बराच वेळ ती घरी परतली नाही. ती अलिगढमध्ये आजीकडे राहत होते.
पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याची हत्या, धारदार शस्त्राने हल्ला करुन दगडाने ठेचलं https://t.co/QcRoPteiFO #Pune | #CrimeNews | #PhDStudent
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
Uttar Pradesh Aligarh Girl Found Dead In Jungle
संबंधित बातम्या :
दरोडा टाकण्यासाठी दोरी, मिरचीसह हत्यारही तयार, पोलिसांनी सापळा रचत मुसक्या आवळल्या