अलिगढ : उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये (Uttar Pradesh Aligarh) 22 वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. लग्नासाठी दबाव आणल्याने प्रियकराने तिला विषारी इंजेक्शन (Poisonous Injection) दिल्याचं समोर आलं आहे. एका खासगी रुग्णालयात एकत्र नोकरी करत असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले होते. मात्र लग्नाचा तगादा लावल्याने बॉयफ्रेण्डने तरुणीचा काटा काढला. आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या हत्या प्रकरणाचा (Murder) अधिक तपास करत आहेत.
उत्तर प्रदेशातील अलिगढमधील क्वार्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जीवनगढमध्ये हा प्रकार घडला. राहत्या घरी युवतीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. पोलिसांची फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. तिथून दोन सीरींज ताब्यात घेण्यात आल्या.
घटनास्थळी एकापेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित होत्या, असं पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळलं. मयत युवतीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तिचे रिझवान नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध सुरु होते. दोघंही एका खासगी रुग्णालयात काम करत होते.
तरुणी लग्नासाठी रिझवानवर दबाव आणत होती. मात्र त्याला लग्न करायचं नव्हतं. त्यामुळे इंजेक्शनमध्ये विषारी पदार्थ मिसळून त्याने तिला टोचलं. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
संबंधित बातम्या :
अल्पवयीन गर्लफ्रेण्डसोबत लग्नाला विरोध, दत्तक मुलाकडून आईची हत्या
नागपुरातील महिला कंडक्टरच्या हत्येचं गूढ उकललं, दाम्पत्याला अटक
बहिणीचा नकार भावाच्या जीवावर, प्रियकराकडून सूड, प्रेयसीच्या चिमुकल्या भावाची हत्या