नवी दिल्ली : नराधम बापाने आठ वर्षाच्या मुलीवरती बलात्कार (Rape) केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. त्यामुळे संपुर्ण शहरात (Bareilly) खळबळ माजली आहे. त्याच परिसरात मागच्या महिनाभरापुर्वी एका युवकाने विद्यार्थीनीवरती बलात्कार केला होता. विशेष म्हणजे ज्यावेळी बापाने मुलीवर बलात्कार केला, त्यावेळी मुलीच्या सावत्र आईने (step mother) बापाला मदत केली असल्याची पोलिसांकडे तक्रार दाखल झाली आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली परिसरातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीच्या नराधम बापाला आणि सावत्र आईला अटक केली आहे. ही घटना रात्रीच्यावेळेस घडली आहे. ज्यावेळी नराधम बाप बलात्कार करीत होता, त्यावेळी तिच्या सावत्र आईने मुलीचं तोंड दाबलं होतं. सकाळी मुलीने तिच्या काकांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं.
आरोपी केसर हा रेल्वे स्टेशन परिसरात बुट पॉलिश करण्याचं काम करतो. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. आरोपी काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला असल्याचे मुलीच्या काकांनी पोलिसांना सांगितले आहे. पोलिस दोन आरोपीची कसून चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे.
मागच्या महिनाभरापुर्वी बरेलीमध्ये एका तरुणाने शाळेच्या विद्यार्थींवरती बलात्कार केला आहे. त्या तरुणाला पोलिसांनी अटक केली, त्याची सुध्दा चौकशी सुरु आहे. त्या तरुणाने तरुणीला जबरदस्तीने हॉटेलमध्ये नेलं आणि तिथं तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तो तरुण नशेत होता असं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.