लग्न (Marriage dispute) म्हटलं की लग्नाचा मेन्यूही आला. लग्नाच्या मेन्यूमध्ये काय ठेवायचं, काय नाही, यावरुन बरीच चर्चाही होते. पण लग्नाच्या दिवशी काय होईल, याचीही काही कुणी शाश्वती देऊ शकत नाही. आता लग्नात चक्क रसमलाई मिळाली नाही, म्हणून नवरीला मंडपातच ठेवून घरातले निघून गेल्याची घटना समोर आलीय. रसमलाई नाही मिळाली म्हणून लग्न मोडलं. प्रकरण इतकं वाढलं की अखेर पोलिसात तक्रार (Police Complaint) करावी लागली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून दुसऱ्या पुन्हा या दोघाचं अर्थवट राहिलेलं लग्न लावलं. ही घटना घडली उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) एका जिल्ह्यामध्ये. लग्नाच्या सुरुवातीला आनंद, उत्साह, बॅन्ड बाजा नाच गाणं असं सुरु होतं. वरात आली, तशी मुलीकडच्यांकडून जंगी स्वागतही पाहुण्यांचं करण्यात आली. पण लग्नाच्या नवरदेवाच्या काही उनाड मित्रांनी दारु पित धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. सारखी रसमलाई हवी, अशी मागणी नवरदेवाचे मित्र नशेत करु लागले आणि मग सुरु झालं भांडण!
उत्तर प्रदेशच्या सम्भल जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. एका गावात यजमानी आणि पाहुण्यांमध्ये वाद इतका ताणला गेला, की भर मंडपामध्ये लग्न मोडलं. जेव्हा मुलीकडच्या लोकांनी या संपूर्ण प्रकरणी पोलिसात तक्रार दिली, तेव्हा नवरामुलाच्या मित्रांची नशा चांगली उतरली. चार जणांविरोधात तक्रार दाखल कऱण्यात आली होती. पोलिसांनी आपला खाक्या दाखवता लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा लग्न लावून देण्यात आलं.
15 जूनला ही घटना घडली. नवरी मुलीच्या नातलगांनी पाहुण्यांच्या स्वागतासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. पण फक्त रसमलाई मिळाली, म्हणून नवऱ्या मुलाचे मित्र नाराज झाले. सात फेरे होण्याआधीच मंडपातून मुलाकडे नातलग माघारी परतले होते. यामुळे मुलीकडच्या लोकांचाही अपमान झाला होता. अखेर मुलीचे नातलग पोलिसांत गेले आणि त्यांनी याप्रकरणी तातडीनं रितसर तक्रार दिली.
दरम्यान, 15 जूनला अर्धवट राहिलेला लग्नाचा विधी पोलीस तक्रारीनंतर 16 जूनला पूर्ण कऱण्यात आला. नवरी मुलीच्या आणि नवऱ्या मुलाच्या घरातल्यांच्यातील गैरसमज दूर करण्यात आले. पुन्हा धूमधडाक्यात रसमलाईविना लग्न लावण्यात आलं आणि मुलीला सासरी पाठवण्यात आलं.