लखनौ : उत्तर प्रदेशातील बांदा (Uttar Pradesh Crime) येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आजी-आजोबांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा बदला नातवाने हत्या (Murder) करुन घेतला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सूड उगवण्यासाठी (Revenge) आपण आजी-आजोबांना धमकी देणाऱ्याला सोबत घेतले, आधी त्याला दारु प्यायला लावली, नंतर पंचाने गळा आवळून खून करत त्याचा मृतदेह नाल्यात फेकला आणि घटनास्थळावरून पळ काढला, असं चौकशीत त्याने पोलिसांना सांगितलं.
ही घटना उत्तर प्रदेशातील बिसांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पराबिहारी गावात घडली आहे. आरोपी तरुणाच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. त्याचे आजी-आजोबा असे दोघेच घरी राहतात. मोतीलाल अनेकदा त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ करत, जीवे मारण्याची धमकी देत असे. जर मोतीलालने आपल्या आजी-आजोबांचा जीव घेतला, तर त्यांच्या मृत्यूनंतर आपण एकटे पडू, अशी भीती आरोपी तरुणाला सतावत होती.
त्यामुळे त्याने मोतीलालची हत्या करुन मृतदेह नाल्यात फेकून दिला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून बाईक आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 2 मे रोजी पारा बिहारी येथील तिमुडिया नाल्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. पेस्ता गावात राहणाऱ्या मोतीलालचा मृतदेह असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
एएसपी म्हणाले की, हत्येचा आरोपी अरविंद कुमार याला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने सांगितले की, त्याचे वडील बदलेश यांची 2016 मध्ये हत्या झाली होती, काका तुरुंगात आहेत. त्याच्या घरात फक्त आजोबा आणि आजी आहेत, ज्यांच्यावर तो खूप प्रेम करतो. मात्र शेजारी राहणारा मोतीलाल हा वारंवार त्यांचा अपमान करायचा. यामुळे तो खूप दुःखी झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
संबंधित बातम्या
Solapur | CNG पंपावर गॅस भरताना स्फोट, वाहन चालकाने गाडी पुढे नेली अन् पाइपच उखडला !
विलेपार्ले पश्चिमेच्या एलआयसी ऑफिसला आग, महत्वाचे दस्ताऐवज जळाल्याची भीती