उत्तर प्रदेश : पतीने पत्नीकडे दारु पिण्यासाठी 100 रुपये मागितले. यावरुन झालेल्या वादातून पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीने वादादरम्यान केलेल्या मारहाणीमध्ये पतीचा मृत्यू झाला. आपल्या मारहाणीमुळे पतीचा जीव गेल्याचं कळताच पत्नीने घरातून पळ काढला. ही घटना उत्तर प्रदेश जिल्ह्यातील जालौनमध्ये घडली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे. पतीला दारु पिण्यासाठी 100 रुपये देण्याची पत्नी तयार नव्हती. यावरुन पती-पत्नीत वाद झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जालौन येथील कोंच कोतवाली येथे ही धक्कादायक घटना घडली. सिकरी गावात राहणारा तुलाराम याचा मुलगा सुशील कुमार हा पत्नी दीपा सोबत नव्या पटेल नगरमध्ये राहत होता. एका भाड्याच्या घरात हे दोघेही जण राहत होते. सुशील कुमार कुटुंबाचं पालन पोशण करण्यासाठी मजुरी करायचा.
सुशील कुमार याला दारुचं व्यसन होतं. तो नेहमीच नशेत असायचा. यामुळे पती-पत्नीमध्ये सतत भांडणं व्हायची. शुक्रवारी रात्री तो मजुरी करुन दारुच्या नशेतच घरी परतला होता. घरी आल्यानंतर त्याला आणखी दारु पिण्याची इच्छा झाली. त्यासाठी तो पत्नीकडे 100 रुपये मागत होतो.
पत्नी दीपा हीने सुशील कुमार याला पैसे देण्यास नकार दिला. 100 रुपयेच काय एक रुपयाही तुला देणार नाही, असं ती म्हणाली. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. वादादरम्यान,एक लोखंडी रॉडने सुशील कुमार याच्या डोक्यात घाव घातला. हा घाव इतका गंभीर होता की सुशील कुमार जागीत कोसळला आणि त्याच्या डोक्यात रक्तस्राव होऊ लागला.
थोड्याच वेळात सुशील कुमारचा मृत्यू झाला होता. तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सुशील कुमार याची ती अवस्था पाहून त्याची पत्नी दीपा घाबरुन गेली. ती लगेचच घरातून पळून गेली. त्यानंतर आजूबाजूचे शेजारी आले आणि त्यांनी सुशीलची माहिती त्याच्या भावाला दिली.
सुशीलचा भाऊ विनोद त्याला घेऊन रुग्णालयात गेला. पण उपचारादरम्यान सुशीलचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पोलिसांना कळवण्यात आलं. पोलिसांनी सुशील कुमारचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टेम साठी पाठवला. याप्रकरणी आता पुढील तपास केला जातोय.
सुशील कुमार याचा भाऊ विनोद यांने त्याच्या वहिनीवर हत्येचा आरोप केला आहे. लोखंडी चिमट्याने आपल्या भावाची हत्या करण्यात आली असल्याचं त्याने म्हटलंय. लोखंडी चिमटा सुशीलच्या डोक्यात मारल्यामुळे सुशीलचा मृत्यू झाला. जागीच खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन सुशील बेशुद्ध झाला होता. आता पोलिसांनी प्राप्त तक्रारीनुसार सुशीलच्या पत्नीवर हत्येचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. सध्या ती फरार आहे.