लखनौ : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये (Uttar Pradesh Crime) रामगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सलाई येथे राहणाऱ्या तरुणाने सासुरवाडीहून परतल्यानंतर आत्महत्या (Suicide) केल्याचा आरोप आहे. हा तरुण पत्नीला घेण्यासाठी सासरच्या घरी गेला असता, तेथे त्याचा सासरच्या माणसांसोबत वाद झाला. तरुणाने चार पानांची सुसाईड नोटही (Suicide Note) लिहिली आहे. शिवानी, तू खुश राहा, असं पतीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 24 वर्षीय मोहन सिंगचे सिरसागंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिवानीसोबत दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. यानंतर पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्याने शिवानी 10 महिन्यांपासून सिरसागंज येथील तिच्या माहेरी राहत होती.
मोहन गुरुवारी सकाळी शिवानीला घेण्यासाठी गेला होता, मात्र तेथे त्याचा शिवानीच्या कुटुंबीयांशी वाद झाला. या घटनेचा राग येऊन विजेचे काम करणाऱ्या मोहनने रात्री सलाई येथील राहत्या घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
आई गीता देवी यांनी मुलगा मोहनला फोन केला असता काहीच उत्तर मिळत नव्हते. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता मोहन गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला दिसला. यानंतर तात्काळ रामगड पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली.
रामगढ पोलीस ठाण्याचे प्रभारी हरवेंद्र मिश्रा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. मोहनचा फोन तपासला असता, त्यात त्याचा मृत्यू होण्यापूर्वीचा एक व्हिडिओही तयार करण्यात आला होता, ज्यामध्ये ऑडिओ खराब होता. रडत मोहनने व्हिडिओ बनवला होता. मोहनने 4 पानी सुसाईड नोट लिहून नंतर आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये मोहनने पत्नीचे मोठे काका आणि काकूवर गंभीर आरोप केले आहेत. सुसाईड नोटमध्ये माझ्या पत्नीचे मोठे काका आणि काकू यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती त्याने केली आहे. पत्नी शिवानीने आनंदी राहावे, असेही त्याने लिहिले आहे.
रामगढ पोलिस स्टेशनचे प्रभारी हरवेंद्र मिश्रा सांगतात की, पती-पत्नीमधील वाद हे आत्महत्येचे कारण आहे. मोहनची पत्नी 10 महिन्यांपासून सासरच्या घरी राहते. नैराश्येतून मोहनने आत्महत्या केल्याचे समजते. मृताच्या नातेवाईकांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या
उदयपूरमध्ये पती-पत्नीमधील वादातून तीन मुलांची हत्या करुन महिलेची आत्महत्या
नागपूरमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, बेरोजगारीला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
नेवाळीत 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट