उत्तर प्रदेश : दीड वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार (Minor girl raped) केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आलीय. ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh Crime News) इटा (Etah) इथं घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी असलेल्या 25 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. सध्या उत्तर प्रदेश पोलिसांकडून या घटनेप्रकरणी अधिक तपास केला जातोय.
दीड वर्षीय चिमुकलीच्या मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. इटा येथील मरहरा पोलीस स्थानकात दीड वर्षांच्या चिमुकीलवर 25 वर्षांच्या तरुणाच्या बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला होता.
या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत तातडीनं तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, दीड वर्षांच्या चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत आढळून आली असल्याचीही माहिती समोर आलीय.
गंभीररीत्या जखमी झालेली आणि रक्ताच्या थारोळ्यात जिवाच्या आकांतानं ही चिमुरडी रडत होती. दीड वर्षीय पीडित चिमुरडीचे कुटुंबीय जेव्हा घरी आले, तेव्हा ते मुलीची अवस्था पाहून हादरुनच गेले.
A 25 Year old man was arrested for allegedly attempting to rape 1.5 yr girl in Etah Uttar Pradesh.
He fled from the spot leaving her bleeding and crying in a lane. pic.twitter.com/LS2qohh3VZ
— Ahmed Khabeer احمد خبیر (@AhmedKhabeer_) November 9, 2022
शेजारी राहणाऱ्या इसमाने दीड वर्षांच्या कोवळ्या जीवासोबत गैरकृत्य केल्याचा संशय कुटुंबीयांना आला. शेजारी राहणाऱ्या तरुणाचा शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तोपर्यंत नराधम आरोपी फरार झाला होता. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांना पोलिसात तक्रार दाखल केली.
पीडित चिमुरडीची आजी तिला घेऊन इटाा येथील महिला रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेली. तिथे या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला असल्याच्या संशयाला दुजोरा मिळालं. त्यामुळे पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल केली. आता आरोपीला अटकही करण्यात आली असून पुढील तपास केला जातोय.