मुंबई : उत्तर भारतातील गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर (Subhash Singh Thakur) याने अँटिलिया जिलेटिन (Antilia Gelatin Bomb Scare) प्रकरणात कोणत्याही कट कारस्थानामध्ये सहभागी नसल्याचा दावा केला आहे. सुभाषसिंग ठाकूरची टोळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, वसई विरारमध्येही सक्रिय असल्याचं म्हटलं जातं. काही काळापूर्वीच वसुलीसाठी मालाडमध्ये एका व्यापाऱ्यावर त्याच्या टोळीने गोळीबार केल्याची माहिती आहे. (Uttar Pradesh Don Subhash Singh Thakur denies meeting Sachin Vaze planning Antilia Gelatin Case)
सुभाषसिंग ठाकूर आणि सचिन वाझेंची भेट झाल्याचे दावे
अँटिलिया स्फोटक प्रकरणी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी सुभाषसिंग ठाकूर याच्या माध्यमातून कट रचल्याचा दावा केला जात होता. टेलिग्रामवर वाझेंनी ठाकूरला मेसेज पाठवल्याचं बोललं जात होतं. BHU मध्ये सुभाषसिंग ठाकूर आणि वाझे या दोघांची मध्यस्थाने भेट घडवल्याची माहिती होती.
टेलिग्राम संदेश पाठवल्याच्या वृत्ताचा इन्कार
गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याने वाराणसीतील आपले वकील जालंदर राय यांच्यामार्फत मुंबईतील वकील के. एम. त्रिपाठी यांच्याद्वारे परिपत्रक जारी केले. अँटिलिया प्रकरणात कोणत्याही प्रकारचा हात असल्याचा किंवा टेलिग्राम संदेश पाठवल्याच्या वृत्ताचा त्याने इन्कार केला आहे.
ना वाझेंशी भेट, ना तिहार जेलमधील तहसीनशी ओळख
यूएईवरुन धमकीचं पत्र पाठवायचं होतं, परंतु नंतर हे काम तिहार जेलमध्ये कैद तहसीनच्या माध्यमातून हे काम केलं गेलं. आता गँगस्टर सुभाषसिंग ठाकूरचे उत्तर प्रदेशातील वकील जालंदर राय यांनी ठाकूर आणि वाझे यांची कुठलीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं. यूएईमधील कोणालाही तो ओळखत नाही किंवा तहसीनशीही ओळख नसल्याचं राय यांनी सांगितलं. जैश-उल-हिंदच्या टेलिग्राम संदेशाशीही त्याचा संबंध असल्याचा दावा वकिलाने फेटाळला. हे सर्व दावे केवळ बातमी खळबळजनक करण्यासाठी केले जात असल्याचंही राय यांनी म्हटलं. (Subhash Singh Thakur denies meeting Sachin Vaze )
वाझेंच्या हृदयातील दोन रक्तवाहिन्या 90 टक्के ब्लॉक
अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणातील मुख्य संशयित सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या प्रकृतीबाबत आणखी एक चिंतादायक माहिती समोर आली आहे. सचिन वाझे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या दोन रक्तवाहिन्या 90 टक्के ब्लॉक असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सचिन वाझे यांनी वकील आबाद पोंडा यांनी विशेष न्यायालयात सचिन वाझे यांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला आहे
संबंधित बातम्या :
सचिन वाझेंच्या हृदयातील दोन रक्तवाहिन्या 90 टक्के ब्लॉक; वकिलांची महत्त्वाची मागणी
(Uttar Pradesh Don Subhash Singh Thakur denies meeting Sachin Vaze planning Antilia Gelatin Case)