उत्तर प्रदेश | 10 नोव्हेंबर 2023 : डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. रुग्णांना जीवनदान त्यांच्यामुळे मिळते. आपला रुग्णाला लवकरात लवकर बरे करणे हेच डॉक्टरांचे प्रथम कर्तव्य असते. परंतू डॉक्टरांच्या पेशाला काळीमा फासणारे देखील असतात. आपल्या क्षणिक स्वार्थासाठी हे डॉक्टर संपूर्ण पेशालाच काळीमा फासत असतात. त्यामुळे खरोखरच सज्जन असलेल्या डॉक्टरांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत असतं. अशाच एक डॉक्टर पैशांसाठी रुग्णांच्या जीवाशी खेळल्याचे उघडकीस आले आहे. त्याने अनेक रुग्णांना गरज नसतानाही पेसमेकर बसविल्याचे उघडकीस आले आहे.
उत्तर प्रदेशातील सैफई येथील हे प्रकरण आहे. उत्तर प्रदेशातील आयुर्विज्ञान विद्यापीठातील कोट्यवधीचा घोटाळा उघडकीस आला आहे. आरोपी डॉक्टर समीर सराफ याने आपल्या स्वार्थासाठी 600 लोकांच्या जीवाशी खेळण्याचा उद्योग केला आहे. ज्यांना खरोखरच गरज नव्हती त्यांनाही त्याने पेसमेकर बसविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात डॉ. समीर सराफ याला अटक करण्यात आली आहे.
बातमीनूसार साल 2018 मध्ये आरोपी डॉक्टरने पेसमेकर लावण्यासाठी दुप्पट पैसे उकळले. साल 2019 मध्ये रेशमा नावाच्या महिलेकडून एक लाख 85 हजार रुपये घेऊन पर्मानंट पेसमेकर लावला होता. कानपूरच्या कृष्णा हेल्थकेअरची पावती तिला देण्यात आली होती. दोन महिन्यात तिचा पेसमेकर खराब झाला. निधन झालेल्या महिलेच्या पतीने मोहम्मद ताहीर अंसारी याने तक्रार केली. त्याने या डॉक्टरवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. कायद्यानूसार या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी अंसारी यांनी केली आहे. त्याने अनेकांना गरज नसताना पेसमेकर बसविल्याचा आरोप केला आहे.
पेसमेकर एक छोटे उपकरण असते जे छातीच्या डाव्याबाजूला इम्प्लांट केले जाते. हृदयाच्या अनियंत्रित गतीला नियमित करण्याचे ते काम करते. पेसमेकर मध्ये बॅटरी, कंप्युटराईज जनरेटर आणि वायर असतात. पेसमेकर ज्यांना वारंवार चक्कर येते. किंवा शुद्ध हरपते किंवा ज्यांना हृदय विकाराचा झटका येतो त्यांनाच बसविले जाते.