लखनौ : घराबाहेर वाळत घातलेल्या महिला अंतर्वस्त्रांची चोरी झाल्याचा चित्रविचित्र प्रकार उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) उघडकीस आला आहे. या प्रकरणी रविवारी मेरठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फूटेज पाहिल्यानंतर तरुणींच्या घराबाहेर घिरट्या घालणाऱ्या स्कूटीस्वार तरुणांवर संशय आहे. (Uttar Pradesh Girls Under Garments stolen Thief Caught in CCTV)
स्कूटीस्वार तरुण सीसीटीव्हीत कैद
मेरठमधील सदर बाजार भागात राहणारे काही तरुण हे तरुणींच्या अंडरगारमेंट्सची चोरी करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे घराबाहेर वाळणारी अंतर्वस्त्र स्कूटीस्वार तरुण पळवून गेल्याचा आरोप केला जात आहे. याआधीही अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती आहे. हा प्रकार ऐकून पोलिसही अवाक झाले. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला.
अंडरगार्मेंट्सची चोरी, कारण काय
अंतर्वस्त्रांच्या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. स्थानिकांनी हे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना उपलब्ध करुन दिले. यामध्ये दोन तरुण अंतर्वस्त्रांची चोरी करताना स्पष्ट दिसत आहे. या चोरीमागे तरुणांच्या काही सुप्त लैंगिक इच्छा आहेत, की तंत्र मंत्र विद्या, याचा शोध पोलीस घेत आहेत.
किमान डझनभर लोकांनी अंतर्वस्त्रांची चोरी झाल्याची तक्रार देऊन पोलिसांकडे त्वरित कारवाईची मागणी केली. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
उत्तर प्रदेशातील विचित्र घटनेच्या आठवणी
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये सप्टेंबर 2019 मध्ये असाच एक विचित्र प्रकार घडला होता. मुजफ्फरनगरमध्ये 24 वर्षांपासून भ्रष्टाचार आणि भू-माफियांविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या एका शिक्षकावर पोलिसांनी विचित्र कारवाई केली होती. विजय सिंह या शिक्षकावर पोलिसांनी उघड्यावर अंतर्वस्त्र वाळत घातल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.
दुसरीकडे, अमेरिकेच्या मिन्नासोटा राज्यातही एक असाच विचित्र नियम आहे. तिथे महिला आणि पुरुषांची अंतर्वस्त्रे एकत्र वाळत घालण्यावर बंदी आहे.
संबंधित बातम्या :
गोड बोलून मुलींशी मैत्री, नंतर नातेवाईक आजारी असल्याचं सांगत पैशांसाठी याचना, चोरटा जेरबंद
उघड्यावर अंतर्वस्त्र वाळत घातल्याने शिक्षकावर गुन्हा, जगभरातील 11 विचित्र बंदी
(Uttar Pradesh Girls Under Garments stolen Thief Caught in CCTV)