500 सीसीटीव्हींच्या फुटेजच्या तपासानंतर पोलिसांनी केला ब्लाइंड मर्डर केसचा उलगडा

| Updated on: Oct 11, 2023 | 4:53 PM

मृत तरूणाच्या नावे बरीच जमीन होती, त्याची किंमत लाखोंच्या घरात होती. याचीच आरोपीला लालसा होती आणि त्यापायी त्याने पीडित मुलाचा काटा काढला. मात्र या ब्लाइंड मर्डर केसचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी बरीच मेहनत करावी लागली.

500 सीसीटीव्हींच्या फुटेजच्या तपासानंतर पोलिसांनी केला ब्लाइंड मर्डर केसचा उलगडा
Follow us on

सहारणपूर | 11 ऑक्टोबर 2023 : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद भागात 3 ऑक्टोबर रोजी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. जिथे एका तरूणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. मात्र काहीच पुरावा मिळत नव्हता. या ब्लाइंड मर्डर केसचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र एक केले. तब्बल 500 सीसीटीव्ही तपासले, अखेर त्यातून काही महत्वाचे क्ल्यू मिळाले. त्याच आधारे पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. मात्र आरोपींची नावं समजताचं मृताच्या कुटुंबियांना मोठा धक्काच बसला.

त्या तरूणाच्या चुलत भावानेच त्याच्या एका मित्रासह हत्या घडवून आणल्याचे पोलिसांनी उघड केले. याप्रकरणी पोलिसांनी मृत तरूण पंकज याच चुलत भाऊ अनुराग आणि त्याचा मित्र उज्ज्वल यांना बेड्या ठोकल्या. पोलिसी खाक्या दाखवताचा दोघांनीही त्यांचा गुन्हा कबूल केला.

का केला खून ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत मुलगा पंकज हा मूळचा मुझफ्फरनगर जिल्ह्यातील कान्हेरी येथील रहिवासी होता. मात्र शिक्षणासाठी तो देवबंदच्या मोहल्ला कायस्थवाडा येथे त्याच्या आत्याच्या घरी रहायचा. तो नववीत शिकत होता. पंकज हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या नावे 8 एकर जीन होती. ज्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे 80 लाख रुपये इतकी होती. पंकजच्या काकाचा मुलगा, त्याचा चुलतभाऊन अनुराग याचा त्या जमीनीवर बऱ्याच काळापासून डोळा होता. पंकजला मार्गातून हटवले तर ही जमीन आपल्या नावावर होईल आणि कोणीहीआपल्याव संशयही घेणार नाही, असा विचार अनुरागने केला. त्यानंतर पैशांच्या लोभापायी त्याने हत्येता प्लान आखला आणि त्याचा मित्र उज्ज्वल यालाही पैशांची लालूच दाखवून या प्लानमध्ये सहभागी करून घेतले.

ऑनलाइन खरेदी केलं हत्यार

त्यानंतर अनुरागने ऑनलाइन शॉपिंग ॲपवरून एक मोठा चाकू विकत घेतला आणि काही कारणाने 3 ऑक्टोबर रोजी पंकजला बोलावून त्याला जंगलात नेले. तेथे त्याच चाकूने अनुराग आणि उज्ज्वलने पंकजचा गळा चिरून त्याचा खून केला आणि मृतदेह नदीत फेकून तिथून पळ काढला. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने त्याचे कुटुंबिय हादरले आणि आरोपींना पकडण्याची मागणी करत पोलिसांत धाव घेतली

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तब्बल 500 सीसीटीव्हींचे फुटेज बारकाईने तपासले आणि अखेर काही क्लू सापडल्यानंतर अनुराग व त्याच्या मित्राला अटक केली. मोठी जमीन आणि काही पैशांच्या लालसेपोटी त्यांनी पंकजची हत्या केली होती. दोघांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.